शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

एसटी मुख्यालयाच्या नुतनीकरणाचा खर्च ४८ कोटी

By admin | Updated: June 11, 2016 04:02 IST

राज्यात दुष्काळी परिस्थीती असल्याने एसटी महामंडळाला कोट्यवधींच्या नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे माहिती नुकतीच समोर आली

मुंबई : राज्यात दुष्काळी परिस्थीती असल्याने एसटी महामंडळाला कोट्यवधींच्या नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे माहिती नुकतीच समोर आली होती. त्यामुळे महामंडळाने दुष्काळी परिस्थीती असल्याचे सांगत वर्धापन दिन साधेपणाने साजरा केला होता. मात्र याच परिस्थीतीचा एसटी महामंडळाला आता विसर पडला आहे. महामंडळाने आपल्या मुंबईतील मुख्यालयाच्या नुतनीकरणासाठी तब्बल ४८ कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला असून हे काम जुलैपासून सुरु केले जाणार आहे. त्यासाठी कार्यालयातील सामानाची बांधाबांध करण्यासही सुरुवात करण्यात आली आहे. मुंबई सेंट्रल येथे एसटी महामंडळाचे मुख्यालय असून या मुख्यायलयात ४०० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. एसटीचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक यांच्या कार्यालयांबरोबरच विविध विभागांच्या महाव्यवस्थापकांचीही कार्यालये तेथे आहेत. या इमारतीचे नुतनीकरण करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. जवळपास ४८ कोटी रुपये कामासाठी खर्च केले जाणार असून संपूर्ण इमारतीला काचा लावण्यात येणार आहेत. तर प्रत्येक विभाग कार्यालयातील फर्निचरही बदलण्यात येणार आहे. या इमारतीलाच पूर्णपणे कॉर्पोरेट लूक दिला जाईल. मुख्यायालयात असणाऱ्या अनेक कार्यालयांतील सामान आणि कर्मचारी हे दुसरीकडे स्थलांतरीत केले जाणार आहेत. मुख्यालयातील काही कर्मचाऱ्यांना तर विद्याविहार येथील एसटीच्या कार्यालयात पाठविण्याचाही निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)>दुष्काळी भागातील जनतेसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार दिला होता. राज्यातील अनेक भागांत एसटीचे प्रवासी भारमान घटले असून जानेवारी २0१६ पासून आतापर्यंत ७0 कोटींपेक्षा जास्त नुकसान महामंडळाला सोसावे लागत आहे. महामंडळाला दुष्काळाच्या झळा बसत असतानाच आता होणाऱ्या नुतनीकरणाच्या कामावर अनेक उलटसुलट चर्चा महामंडळात आहेत. >नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बोलाविणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. साधारण दोन ते तीन वर्षापूर्वीच एसटी मुख्यालयातील काही अधिकाऱ्यांच्या कार्यालयांतील अंतर्गत सजावटीवर लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र आता नुतनीकरण केले जाणार असल्याचे हा खर्च वायाच जाणार आहे. यासंदर्भात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांना विचारले असता, हे काम जरी होणार असले तरी त्यावर अजून निर्णय बाकी आहे. नुतनीकरणाचे काम हे अंतर्गत केले जाईल, अशी माहीती त्यांनी दिली.