गृहराज्यमंत्र्यांनी सोडले रान मोकळे : राम शिंदे यांचा वादग्रस्त सल्लामाजलगाव (बीड) : भ्रष्ट राजकारणी व अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची भाषा करीत सत्तेवर आलेल्या भाजपा-शिवसेना सरकारमधील गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी गृहखाते वगळता इतर कोणत्याही खात्यात भ्रष्टाचार करा, असा वादग्रस्त सल्ला दिला आहे.येथील पोलीस ठाण्याच्या भूमिपूजन समारंभात इतरत्र बिनधास्त पैसे खा, भ्रष्टाचार करा. परंतु पोलीस खात्याची इमारत मात्र दर्जेदार बांधा, असा सल्ला त्यांनी दिला. येथील भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेचा वाद शमतो न शमतो तोच पुन्हा खा. डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीतच गृहराज्यमंत्र्यांनी भ्रष्टाचार करण्याचा अजब सल्ला दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. गोपीनाथ मुंडे गृहमंत्री असताना त्यांनी पोलीस खात्याची मान उंचावण्याचे काम केले; परंतु मागील १५ वर्षांत पोलिसांचे मनोधैर्य खचविण्याचे काम झाले, असा आरोप त्यांनी केला. युतीच्या काळात गृहखात्याला चांगले दिवस आले होते; परंतु १५ वर्षांत गृहखात्याची पुन्हा वाईट अवस्था झाली. ती आता सुधारली जाईल, असे खा़ प्रीतम मुंडे यांनी सांगितले. माजलगावचे नगराध्यक्ष, पंचायत समितीच्या सभापतींना निमंत्रण नसल्याने त्यांनी कार्यक्रमाचा निषेध केला. भाजपाच्या अनेक पदाधिकारी हे निमंत्रण नसल्याने कार्यक्रमाकडे फिरकलेच नाहीत. (प्रतिनिधी)काय म्हणाले गृहराज्यमंत्री ?गृहखाते माझ्याकडे असल्याने त्याच्या कामात पैसे खाऊ नका, तुम्हाला खाण्यासाठी बाकी सगळे रान मोकळे आहे. - राम शिंदे, गृहराज्यमंत्री
गृहखाते वगळता इतर खात्यांत भ्रष्टाचार चालेल
By admin | Updated: February 5, 2015 02:57 IST