शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई अंतर्गत दुरुस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार?

By admin | Updated: May 19, 2016 02:02 IST

पुरंदर तालुक्यातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या टंचाई आराखड्याअंतर्गत सध्या दुरुस्तींची कामे सुरू झालेली आहेत;

जेजुरी : दुष्काळी परिस्थितीत पिचणाऱ्या पुरंदर तालुक्यातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या टंचाई आराखड्याअंतर्गत सध्या दुरुस्तींची कामे सुरू झालेली आहेत; मात्र यातील अनेक योजनांच्या दुरुस्त्यांची गरज नसतानाही खर्च टाकून कामे सुरू करण्यात आलेली आहेत. या कामातून संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांनी संगनमताने बोगस अंदाजपत्रके तयार करून, मोठ मोठा खर्च टाकून भ्रष्टाचार होत असल्याचा संशय काही ग्रामपंचायतींनी व्यक्त केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने त्वरित चौकशी करण्याची मागणी आहे. शासनाकडून टंचाई अंतर्गत आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्त्यांसाठी खर्चाचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून तालुक्यातील सर्वच प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांची टंचाई आराखड्यातून दुरुस्त्यांची अंदाजपत्रके तयार करून, जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळविण्यात आली आहे. त्याचे रीतसर आॅनलाइन टेंडरही निघालेली आहेत. मात्र, योजनांची दुरुस्ती ठेकेदारांकडून परस्पर होत असल्याने ग्रामपंचायती संभ्रमात आहेत. नाझरे जलाशयावरून नाझरे व इतर चार गावे या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेसाठी टंचाई आराखड्यातून दुरुस्ती केली जात आहे. त्याची टेंडरही निघालेली आहेत. यात नाझरे क. प. १४ लाख ९८ हजार, नाझरे सुपे ८ लाख २४ हजार, पांडेश्वर ९ लाख ५४ हजार, जवळार्जुन १४ लाख ९५ हजार, असे एकूण अंदाजे ४८ लाखांची दुरुस्ती दाखवली आहे.या कामाबाबत नाझरे सुपे आणि नाझरे क.प. या ग्रामपंचायतींना याबाबतची काहीच माहिती नाही. याउलट नाझरे सुपे या ग्रामपंचायतीकडून १४ व्या वित्त आयोगातून योजनेच्या दुरुस्तीसाठी सुमारे तीन लाख रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे. टंचाई आराखड्याअंतर्गत या योजनेच्या दुरुस्तीवर खर्च होत आहे, असे माहीत असते तर ग्रामपंचायतीने वेगळा खर्च केलाच नसता. पाणीपुरवठा विभागाकडून ग्रामपंचायतीला विश्वासात घेतलेले नाही.- प्रभाकर कापरे, उपसरपंच, नाझरे सुपे