शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

माजी मंत्री विजयकुमार गावितांवर भ्रष्टाचाराचा ठपका

By admin | Updated: May 6, 2017 09:20 IST

आदिवासी विकास योजनांमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे राज्य सरकारने नियुक्त केलेल्या एम.जी. गायकवाड चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : २००४ ते २००९ या काळात आदिवासी विकास योजनांमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे राज्य सरकारने नियुक्त केलेल्या एम.जी. गायकवाड चौकशी समितीच्या अहवालातून निष्पन्न झाले आहे. या घोटाळ्याचा ठपका तत्कालीन आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

आदिवासी विकास विभागात ६००० कोटींचा घोटाळा केला आहे, असा आरोप नाशिकचे बहिराम मोतीराम यांनी अ‍ॅड. राजेंद्र रघुवंशी व अ‍ॅड. रत्नेश दुबे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिकेमार्फत केला आहे. यासंदर्भात राज्य सरकारने उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.

समितीने आपला अहवाल न्यायालयात सादर केला. तत्कालीन मंत्री गावित यांनी दिलेल्या आदेशामुळे सरकारला ३ कोटी ९० लाख ८६ हजार ३७६ रुपयांचा  फटका बसला आहे, असा ठपका  ठेवत प्रादेशिक व्यवस्थापक अधिकाऱ्यांनी (आरएमओ) एकूण १४ कोटी ८९ लाख ५३ हजार ६०० रुपयांचा अपहार केला, असा निष्कर्ष समितीने काढला. गॅस बर्नर खरेदीमध्येही घोटाळा झाल्याचे समितीने म्हटले आहे.  १ लाख २३ हजार ९९८ गॅस बर्नर खरेदीची आॅर्डर देण्यात आली.  मात्र महामंडळाच्या घाईमुळे २५,५२७ गॅस बर्नरचे वापटच झाले  नाही. त्यामुळे हे बर्नर गंजले आणि निकामी झाले. ७३ कोटी रुपयांचा अपहारप्रत्येक प्रकल्प अधिकाऱ्याने भ्रष्टाचार केला आहे. आर्थिक वर्षाच्या सरतेशेवटी उरलेला निधी केंद्र व राज्य सरकारकडे परत करणे आवश्यक आहे. मात्र या अधिकाऱ्यांनी तसे केले नाही. त्याचा लेखाजोखा ठेवलेला नाही. कॅश बुकमध्येही नोंद केली नाही. योजनेची अंमलबजावणी करताना कंत्राटदारांना दिलेल्या आगाऊ रकमेचीही कुठेही नोंद केली नाही. दरवेळेस ठरावीक कंत्राटदारालाच कंत्राट देण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी एकूण ७२ कोटी ७४ लाख ७४ हजार ८९१ कोटी रुपयांचा अपहार केला आहे, असा निष्कर्ष समितीने काढला आहे. माजी मंत्री विजयकुमार गावित सध्या भाजपामध्ये आहेत.