शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

कृषी प्रकल्पातील भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब; प्रकल्प संचालकांच्या अहवालात गैरव्यवहाराची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 01:00 IST

समन्वयित कृषी विकास प्रकल्पाचे तत्कालीन प्रकल्प संचालक गणेश चौधरी यांच्या कार्यकाळात झालेली आर्थिक अनियमितता ‘लोकमत’ने उघडकीस आणताच थेट मंत्रालयातून सूत्रे हलली.

- गणेश देशमुखमुंबई : समन्वयित कृषी विकास प्रकल्पाचे तत्कालीन प्रकल्प संचालक गणेश चौधरी यांच्या कार्यकाळात झालेली आर्थिक अनियमितता ‘लोकमत’ने उघडकीस आणताच थेट मंत्रालयातून सूत्रे हलली. विद्यमान प्रकल्प संचालक तथा अमरावती विभागीय महसूल आयुक्तांनीपणन खात्याला तत्काळ सादर केलेल्या अहवालात या प्रकल्पात झालेल्या गैरव्यवहारास दुजोरा दिला आहे.समन्वयित कृषी विकास प्रकल्पातील गैरव्यवहाराबाबत ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीचे कात्रण जोडून सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाचे कार्यासन अधिकारी जयंत भोईर यांनी १९ एप्रिल रोजी प्रकल्प संचालक तथा विभागीय आयुक्त पीयूष सिंग यांच्याकडून चौकशी अहवाल मागविला. सिंग यांनी त्याच दिवशी आर्थिक अनियमिततेवर लख्ख प्रकाश टाकणारा दोन पानी प्राथमिक अहवाल शासनाला सादर केला. याशिवाय, रीतसर चौकशी करून सविस्तर अहवाल लवकरच पणन विभागाला सादर केलाजाईल, असेही अहवालात नमूद केले आहे.२०१६-१७ या साली जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्ष व अंमलबजावणी यंत्रणेद्वारे प्रशिक्षणासाठी ‘सोलास’ या एकमेव संस्थेची निवड केली. १७ आॅगस्ट २०१६ रोजी स्थापन केलेल्या सोलासनेच विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये पशुसंवर्धन व्यवस्थापन प्रशिक्षणे घेतली. त्यापोटी एकूण १ कोटी ५७ लक्ष ९२ हजार रुपये खर्च दाखविण्यात आला. मात्र सदर संस्थेची निवड मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात आली नाही. प्रशिक्षणावर झालेला खर्च पाहता आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी या संस्थेची परवानगी घेणे बंधनकारक असतानाही ती घेण्यात आली नाही. सोलास ही संथा पशुसंवर्धन व्यवस्थापन प्रशिक्षण घेण्यास अपात्र आहे, असे अहवालात म्हटले आहे.यशवंत वाघमारेंवर आक्षेपअहवालात यशवंत वाघमारे यांच्यावर आक्षेप नोंदविले आहेत. वाघमारे हे राजपत्रित पशुधन विकास अधिकारी या पदावर शासकीय सेवेत कार्यरत असतानासुद्धा त्यांनी सोलासमार्फत राबविण्यात आलेल्या पशुसंवर्धन व्यवस्थापन प्रशिक्षणात सहभाग घेतला. त्याचे पुरावे सर्व सहा जिल्ह्यांमधील जिल्हा विकास व्यवस्थापन कक्षांत अपलब्ध आहेत. तत्कालीन प्रकल्प संचालक गणेश चौधरी यांच्या पत्नी उज्ज्वला या स्वागत उद्योग प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेत संचालक आहेत. त्याच संस्थेतील मीरा यशवंत वाघमारे आणि विजया संपत खोमाने या सोलास संस्थेतही कार्यरत आहेत. संस्था निवडीबाबत झालेल्या अनियमिततेमुळे कृषी विकास निधी यांच्याकडून प्रशिक्षणावर झालेला खर्च पूर्णत: अमान्य करण्यात आला आहे. उर्वरित देयकांची रक्कम देण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला असल्याचा स्पष्ट उल्लेख पणन विभागाला सादर करण्यात आलेल्या अहवालात आहे. या अहवालानंतर मंत्रालय स्तरावरून दोषींविरुद्ध कोणती कारवाई केली जाते, याकडे आता लक्ष लागून आहे.‘लोकमत’चे अभिनंदन!फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत, असे सक्षम पुरावे उपलब्ध होऊनही प्रकल्पाच्या निधीचा अपहार शासनदरबारी दाबून ठेवण्यात आला. मंत्री, मंत्र्यांचे खासगी सचिव आणि अतिरिक्त सचिव दर्जाचे अधिकारी या तीन स्तरांवरून हा भ्रष्टाचार उघड न होण्यासाठी प्रयत्न झाले. तथापि ‘लोकमत’ने हा गैरव्यवहार चव्हाट्यावर आणल्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करून लोकमतचे अभिनंदन केले.

टॅग्स :Mantralayaमंत्रालय