शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

१० हजाराच्या कर्जासाठीच्या निकषात सुधारणा

By admin | Updated: June 21, 2017 02:19 IST

१० हजार रुपयांपर्यंतचे खरिप पीक कर्जासाठी राज्य सरकारने सुधारित निकष लागू केले असून आता चार लाख रुपयांपेक्षा

विशेष प्रतिनिधी लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : १० हजार रुपयांपर्यंतचे खरिप पीक कर्जासाठी राज्य सरकारने सुधारित निकष लागू केले असून आता चार लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक ढोबळ उत्पन्न असलेले केंद्र व राज्य शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, शासन अनुदानित सर्व महाविद्यालय व शाळांचे प्राध्यापक, शिक्षक, केंद्र व राज्य शासन सहाय्यित संस्थांचे अधिकारी व कर्मचारी शेतकरी या कर्जासाठी पात्र ठरणार आहेत.या कर्जाच्या लाभार्र्थींसाठीच्या निकषांत काही सुधारणा करणारा जीआर सहकार व पणन विभागाने आज रात्री काढला. त्यानुसार ४ लाख रुपयांपेक्षा अधिक ढोबळ वार्षिक उत्पन्न असलेले अधिकारी, कर्मचारी शेतकरी हे या कर्जासाठी अपात्र ठरतील. आजी/माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी/माजी खासदार, आजी/माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य व महापालिका सदस्य अपात्र ठरतील. काय केल्या सुधारणा१४ जूनच्या जीआरनुसार जिल्हा परिषद/पंचायत समिती सदस्य, महापालिका व नगरपालिका सदस्यांना या कर्जासाठी अपात्र ठरविण्यात आले होते. मात्र आता पंचायत समिती सदस्य व नगरपालिका सदस्यांना पात्र ठरविण्यात आले आहे.हे ठरतील अपात्रआयकर रिटर्न भरणारी व्यक्ती (माजी सैनिक वगळून) जिचे वार्षिक ढोबळ उत्पन्न ४ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाऊन्टंट, अभियंते, व्यावसायिक ज्यांचे वार्षिक ढोबळ उत्पन्न वार्षिक ४ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, नगरपालिकांसारख्या कोणत्याही शासकीय/निमशासकीय संस्थेकडे नोंदणीकृत सेवा पुरवठादार आणि कंत्राटदार ज्यांचे ढोबळ वार्षिक उत्पन ४ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सुतगिरणी, नागरी सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व सहकारी दूध संघांचे अधिकारी व पदाधिकारी (अध्यक्ष व उपाध्यक्ष) आणि मजूर सहकारी संस्थांचे अध्यक्ष ज्यांचे वार्षिक उत्पन्न ४ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. ४ लाख रुपयांपेक्षा जास्त ढोबळ उत्पन असलेली सेवा कर भरण्यासाठी नोंदणीकृत व्यक्ती, वार्षिक उलाढाल १० लाख रुपयांपेक्षा जास्त असलेला गुमास्ताधारक. आधी आयकर रिटर्न भरणारी कोणतीही व्यक्ती अपात्र राहील, असे सरकारने म्हटले होते. आता असे रिटर्न भरणारी पण वार्षिक ४ लाख रुपयांपेक्षा अधिक ढोबळ उत्पन्न असलेली व्यक्तीच अपात्र ठरेल.ज्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे चारचाकी वाहन असेल त्यांना कर्ज मिळणार नाही ही अट कायम ठेवण्यात आली आहे.