शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांची होणार पुन्हा ‘दिवाळी’

By admin | Updated: November 4, 2016 01:16 IST

विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या एका जागेसाठी बहुरंगी लढत होणार आहे.

बारामती : दिवाळीचा सण उत्साहात साजरा झाला. त्यानंतर विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या एका जागेसाठी बहुरंगी लढत होणार आहे. त्यामुळे नगरसेवकांची पुन्हा ‘दिवाळी’ होणार, अशी चर्चा आता रंगली आहे. सध्या नगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. येत्या ११ तारखेपासून प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी १९ नोव्हेंबरला मतदान होत आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांकडून विद्यमान नगरसेवकांना डावलले गेल्यास पक्षाच्या उमेदवाराला डावलून मतदान होण्याची शक्यता आहे. बहुरंगी लढत असल्यामुळे घोडेबाजाराला ऊत येण्याची शक्यता आहे. नगरसेवकांसाठी तर दिवाळीनंतरची निवडणूक दिवाळी पर्वणी ठरणार आहे. यापूर्वी झालेल्या दोन निवडणुका तशा एकतर्फीच झाल्या. त्यामुळे फारसा ‘आर्थिक पाझर’ या निवडणुकीसाठी पात्र असलेल्यांपर्यंत आला नाही, त्याच अनुषंगाने एकापेक्षा अधिक उमेदवार असल्यावर चंगळच होणार, अशी चर्चा रंगत आहे. नगरपालिका निवडणूक तोंडावर असताना सध्याच्या विद्यमान नगरसेवकांना मात्र चांगलाच भाव आला आहे. पुणे विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या अनिल भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास लांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे संजय जगताप, भाजपाचे अशोक येनपुरे, शिवसेनेचे ज्ञानेश्वर खंडागळे, मनसेचे राजेंद्र वागसकर या प्रमुख उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.>बहुरंगी लढतीने नगरसेवकांचे महत्त्व वाढले...विधान परिषदेच्या पूर्वीचा समझोता बासनात गुुंडाळून राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वच जागांवर त्यांचे उमेदवार दिले. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाली. पुणे विधान परिषदेच्या एका जागेसाठीदेखील भोसले यांच्या विरोधात काँग्रेसचे जगताप यांची लढत महत्त्वपूर्ण आहे. तसेच, अन्य दिग्गज ३ उमेदवार असल्याने नगरसेवकांचे मत मिळविण्यासाठी या ५ उमेदवारांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.विशेषत: दिवाळीनंतरची दुसऱ्या दिवाळीच्या फटाक्यांची आतषबाजी करताना उमेदवारांनाही नाकीदम येणार आहे. एकेका नगरसेवकांचे मत महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या तरी पंचरंगी लढत दिसत आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या ५ नोव्हेंबरनंतर चित्र स्पष्ट होईल.>‘रसद’च ठरणार महत्त्वाची : या जागेसाठी एकूण ६८७ मतदार पात्र आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वाधिक २९८, काँग्रेसचे १२४, शिवसेनेचे ७६, भाजपाचे ७१, मनसेच्या ३६, रिपाइंच्या ४, लोकशाही आघाडी १२, शिरूर शहर विकास आघाडी १८, अपक्ष २६ अशी मतांची गोळाबेरीज आहे. त्यामुळे निवडणूक जिंकण्याचा जादूई आकडा गाठण्यासाठी ‘रसद’च महत्त्वाची ठरणार आहे.