शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आता नगरसेवकांची ‘शाळा’

By admin | Updated: February 27, 2017 01:21 IST

शिवसेनेसह भाजपाला घवघवीत यश मिळाल्यानंतर, आता सत्ता स्थापनेसाठीच्या राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत.

सचिन लुंगसे,मुंबई- मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेसह भाजपाला घवघवीत यश मिळाल्यानंतर, आता सत्ता स्थापनेसाठीच्या राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. शिवसेना सत्ता स्थापनेसाठी कोणाची मदत घेणार? या विषयी राजकीय विश्लेषकांची मतमतांतरे असतानाच, मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक ९ मार्च रोजी होणार आहे. परिणामी, मुंबई महापालिकेत सत्ता कोणाची आणि महापौर कोण? हे प्रश्न सध्या निरुत्तरित आहेत. मात्र, महापालिकेची निवडणूक जिंकलेल्या विजयी, विशेषत: नवख्या विजयी उमेदवाराला महापालिका प्रशासनही समजावून घ्यावे लागणार आहे. स्थायी समितीपासून शिक्षण, आरोग्य आणि सुधार समितीची कार्यपद्धती समजावून घेताना, एकंदरच नगरसेवक म्हणून काय-काय करावे लागणार? या प्रत्येक गोष्टीचा आढावा नवनिर्वाचित नगरसेवकांना घेणे भाग आहे, शिवाय मुंबईकरांनादेखील आपले नगरसेवक काय करणार आहेत? हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. त्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय कामकाजासह महापालिका समितींच्या कामकाजाचा सविस्तर आढावा खास नवनिर्वाचित नगरसेवकांसह प्रत्येक मुंबईकरांसाठी आजपासून ‘लोकमत’मध्ये. (उद्याच्या अंकात वाचा : स्थायी समिती, सुधार समिती आणि शिक्षण समितीचे कामकाज)महानगरपालिकेची रचना : महानगरपालिका म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका. वेळोवेळी सुधारित केलेल्या मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ अंतर्गत पालिकेची रचना करण्यात आली आहे. प्रभाग निवडणुकांमध्ये प्रत्यक्ष निवडून आलेले २२७ नगरसेवक आणि पालिकेने नामनिर्देशित केलेले विशेष माहिती आणि प्रशासनाचा अनुभव असलेले ५ नामनिर्देशित नगरसेवकांचा यात समावेश असतो. पालिकेचा कालावधी तिच्या पहिल्या सभेपासून पाच वर्षांचा असतो. सर्वसाधारण निवडणुकीनंतर महानगरपालिकेच्या पहिल्या विशेष सभेत नगरसवेकांमधून एकाची महापौर आणि दुसऱ्याची उपमहापौर म्हणून निवड केली जाते.पालिकेचे कामकाज : कामकाजाकरिता महानगरपालिका मुख्य कार्यालय येथे नगरसेवक जमतात. सभा भरवून अशा सभा बोलावणे, सभांची सूचना, जागा आणि व्यवस्थापन, त्या सभा तहकूब करणे ही कामे केली जातात़ सर्वसाधारणपणे कामकाज चालविण्याच्या आणि तिचे व्यवस्थापन करण्याच्या पद्धतीविषयी योग्य वाटतील, असे विनियम वेळोवळी केले जातात. प्रत्येक महिन्यात एक सामान्य सभा भरविली जाते.विशेष सभा : सार्वत्रिक निवडणुकीनंतरची पालिकेची मार्च महिन्यातील पहिली विशेष सभा घेण्यात येते. महापौर आणि उपमहापौर यांच्या नेमणुकीकरिता दिवस, वेळ आणि ठिकाण पालिका चिटणीस, माजी महापौर आणि आयुक्त यांच्याशी सल्लामसलतीनुसार ठरविण्यात येते.कार्यक्रमपत्रिका वितरण :प्रत्येक सभेच्या सूचनेमध्ये दिवस, वेळ आणि ठिकाण आणि पालिका चिटणीसांनी तेथे होणाऱ्या कामकाजाची स्थानिक वर्तमानपत्रात जाहिरात देऊन आणि सदस्यांना त्यांच्या निवासस्थानी सहपत्रांसहित कार्यक्रमपत्रिका वितरित केली जाते.सभा बोलावणे : महापौर आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये उपमहापौर वा अध्यक्ष, स्थायी समिती एक षष्ठमांशपेक्षा कमी नसतील, इतक्या सदस्यांनी स्वाक्षरी केलेल्या लेखी मागणीनुसार पालिकेची विशेष सभा बोलावता येते.सभेचे कामकाज : पालिकेच्या सभेचे कामकाज चालविण्याकरिता समोर नगरसेवकांच्या संपूर्ण संख्येच्या एक पंचमांश गणसंख्या असावी.महापालिका आयुक्त :शतकापासून मुंबईमध्ये विकसित झालेल्या रचनेनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महानगरपालिका आयुक्त हे सर्वांत महत्त्वाचे पद आहे. हे एक प्राधिकारी आहेत. राज्य शासनामार्फत त्यांची नेमणूक केली जाते. पाणीपुरवठा, रस्ते, पर्जन्य जलवाहिन्या, नाले यासारख्या शहाराच्या विविध संरचनांच्या परिरक्षण आणि मुंबईच्या नागरिकांस कार्यक्षमतेने विविध सेवा देणे ही त्यांची जबाबदारी असते. त्यांना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, महानगरपालिका उपायुक्त, सहायक आयुक्त आणि विविध खात्यांचे प्रमुख कार्य पार पाडण्यासाठी मदत करत असतात.प्रस्तावावर मतदानप्रत्येक सभा महापौर चालवतील किंवा महापौरांच्या उपस्थितीत, उपमहापौर आणि किंवा महापौर व उपमहापौर हे दोन्ही अनुपस्थित असतील, तर सभेमध्ये उपस्थित असलेल्या नगरसेवकांमधून एकाची निवड करून, त्यास काही काळाकरिता अध्यक्ष म्हणून निवडण्यात येते.आयुक्तांस समितीच्या सभेस उपस्थित राहण्याचा आणि त्यात होणाऱ्या चर्चेत भाग घेण्याचा हक्क आहे. त्यास अशा सभेत कोणत्याही प्रस्तावावर मतदान करण्याची किंवा तो मोडण्याची मुभा नसते.अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त : अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांची नेमणूक राज्य शासनामार्फत केली जाते. महानगरपालिका आयुक्तांनी त्यांना नेमून दिलेल्या खात्यांकरिता आयुक्त म्हणून काम करावे लागते. सद्यस्थितीत चार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त कार्यरत आहेत.महानगरपालिका उपायुक्त : महानगरपालिका उपायुक्तांची नेमणूक महानगरपालिका आयुक्त/अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांना आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सहाय्य म्हणून केली जाते. त्यांची नेमणूक राज्य शासनाच्या संमतीने महानगरपालिकेमार्फत केली जाते.सहायक आयुक्त : सहायक आयुक्त हे विभागाचे प्रशासकीय प्रमुख असून, नागरिकांना दिवसेंदिवस देण्यात येणाऱ्या सुविधामध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. मुंबई शहर २४ प्रशासकीय विभागांमध्ये विभागले गेले आहे. प्रत्येक विभागात सहायक आयुक्त (पूर्वी विभाग अधिकारी म्हणून माहीत असलेले) प्रमुख असतात.