शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभर टोलमाफीसाठी नगरसेवकांचा आटापिटा

By admin | Updated: May 23, 2017 02:30 IST

वरळी सागरी मार्गापाठोपाठ आता राज्यातील सर्व टोल नाक्यांवरही विनामूल्य प्रवासासाठी मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांची धावपळ सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वरळी सागरी मार्गापाठोपाठ आता राज्यातील सर्व टोल नाक्यांवरही विनामूल्य प्रवासासाठी मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांची धावपळ सुरू आहे. खासदार आणि आमदार यांना देण्यात येणाऱ्या या सवलतीप्रमाणे नगरसेवकांनाही राज्यातील सर्वच टोल नाक्यांवर टोलमाफी देण्यात यावी, अशा ठरावाची सूचना पालिकेच्या महासभेपुढे मंजुरीसाठी मांडण्यात आली आहे.नगरसेवकांना अनेक उपक्रमांची पाहणी करण्यासाठी बऱ्याच वेळा शहराबाहेर जावे लागते. अशा वेळी मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंक वगळता मुंबईबाहेरील सर्व टोलनाक्यांवर टोल भरावा लागतो. खासदार व आमदार यांना राज्यातील सर्व टोलनाक्यांवर विनामूल्य प्रवास करण्याची सवलत देण्यात येते. या सवलतीच्या धर्तीवर मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना राज्यातील सर्व टोलनाक्यांवरून विनामूल्य प्रवास करण्याची सवलत मिळावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवक तुकाराम पाटील यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. हा ठराव महासभेत मंजूर करून अभिप्रायासाठी आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे.नगरसेवकांना काय काय मिळते?नगरसेवकांना दरमहा दहा हजार रुपये मानधन, पालिका महासभेच्या प्रत्येक बैठकीचे मिळून चारशे ते सहाशे रुपये, इतर समित्यांच्या बैठकांचे मानधन मिळत असते़ तसेच २००७ पासून लॅपटॉप देण्यात येत आहेत़ गेल्या वर्षी मोबाइल फोन व १२०० रुपयांपर्यंत बिलाची रक्कम, बेस्टचा मोफत प्रवास, वातानुकूलित बसगाड्यांमधून मोफत प्रवास मिळत आहे़नगरसेवकांच्या प्रलंबित मागण्यामानधन दहा हजार रुपयांवरून ५० हजार रुपये करणे, बैठकीत उपस्थित राहण्याचा भत्ता प्रत्येक बैठकीचे दीडशे रुपयांवरून पाचशे रुपये वाढ करावी, नगरसेवकांना निवृत्तिवेतन, विमा योजनेचा लाभ, जलतरण तलावाचे मोफत सदस्यत्व, कार्यालयासाठी तसेच घरासाठी भूखंड, मुंबईतील सुपर स्पेशालिटी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार, वांद्रे-वरळी समुद्र सेतूवरून मोफत प्रवास अशा मागण्या यापूर्वी करण्यात आल्या आहेत़यासाठी हवी टोलमाफीमुंबईमध्ये अनेक महत्त्वाचे प्रकल्प राबविले जात असून शहरातील सुमारे सव्वा कोटी जनतेला अत्यावश्यक नागरी सुविधा पुरवण्यासाठी महापालिकेचे नगरसेवक सातत्याने कार्यरत असतात. यासाठी नगरसेवकांना मुंबईबाहेर विविध राजकीय व सामाजिक मेळाव्यांना उपस्थित राहावे लागते. तसेच राज्यातील प्रमुख शहरांमध्येही राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांनाही हजेरी लावावी लागते. त्यामुळे राज्यातील सर्व टोल नाक्यांवर मुंबईच्या नगरसेवकांना टोलमाफी दिली जावी, असे मत ठरावाच्या सूचनेतून मांडण्यात आले आहे.