शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महामंडळांच्या पैशांतून बिल्डरांवरही कृपा !

By admin | Updated: January 13, 2016 01:38 IST

राज्य शासनाची विविध महामंडळे आणि प्राधिकरणांच्या कोट्यवधी रुपयांच्या मुदत ठेवींच्या आधारे काही बिल्डरांसह उद्योगपतींना कोट्यवधी रुपयांचे कॅश क्रेडिट देण्यात आले.

मुंबई : राज्य शासनाची विविध महामंडळे आणि प्राधिकरणांच्या कोट्यवधी रुपयांच्या मुदत ठेवींच्या आधारे काही बिल्डरांसह उद्योगपतींना कोट्यवधी रुपयांचे कॅश क्रेडिट देण्यात आले. केवळ देना बँकच नव्हे, तर इतरही काही राष्ट्रीयीकृत बँका या घोटाळ्यात सामील असण्याची शक्यता आहे. देना बँकेतील मुदत ठेवींचे प्रकरण समोर आले. विविध महामंडळांच्या अधिकाऱ्यांनी याच बँकेच्या विशिष्ट शाखेत मुदत ठेवी ठेवण्यासाठी कोट्यवधी रुपये का दिले, हेही एक गूढ आहे. याचा अर्थ महामंडळांचे अधिकारी आणि बँकेचे अधिकारी यांच्यात काही संगनमत होते का, हा चौकशीचा विषय आहे. ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त मंगळवारच्या अंकात दिल्यानंतर खळबळ उडाली.महामंडळांच्या ठेवी दलालांमार्फत बँकेत का ठेवल्या जातात? महामंडळांचे अधिकारी थेट स्वत: बँक अधिकाऱ्यांशी चर्चा करून का निर्णय घेत नाहीत? ही गुंतवणूक करण्याच्या मोबदल्यात दलालांना महामंडळांकडून कोणते आर्थिक लाभ दिले जातात? की त्यांना बिल्डर, उद्योगपतींकडून कमिशन मिळते, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. हे दलाल आणि उद्योगपती, बिल्डर, काही महामंडळांचे आणि बँकांचे अधिकारी यांच्यातील संगनमताने शासकीय पैशांचा गैरवापर केला असल्याची दाट शक्यता आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाने त्यांची कोणतीही मुदत ठेव देना बँकेत ठेवलेली नाही, असा खुलासा मंगळवारी केला. (विशेष प्रतिनिधी)