शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

‘कॉर्पोरेट सेक्टरचे सहकार्य आवश्यक’

By admin | Updated: March 26, 2016 01:49 IST

समाजातील तळागाळातील व्यक्तींची जोपर्यंत सामाजिक व आर्थिक प्रगती होणार नाही तोपर्यंत देशाची आर्थिक प्रगती होणार नाही. ही बाब लक्षात घेऊनच केंद्र शासन व राज्य शासन

मुंबई : समाजातील तळागाळातील व्यक्तींची जोपर्यंत सामाजिक व आर्थिक प्रगती होणार नाही तोपर्यंत देशाची आर्थिक प्रगती होणार नाही. ही बाब लक्षात घेऊनच केंद्र शासन व राज्य शासन अनुसुचित जाती व जमातीच्या उदयोजकांसाठी विशेष योजना राबवित असून त्यात कॉर्पोरेट सेक्टरमधील उद्योजकांनी आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले.दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीज (डिक्की), केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती वर्षानिमित्त गोरेगांव येथील बॉम्बे कन्वेनशन अँड एक्झिबिशन सेंटरमध्ये पाचवे नॅशनल ट्रेड अ‍ॅन्ड एक्स्पो २०१६ हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत, केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री कुलराज मिश्रा, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते, राज्याचे शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, यांच्यासह उद्योजक उपस्थित होते. डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी प्रास्ताविक भाषणात भारतामध्ये सव्वा लाख उद्योजक बनविण्याचा संकल्प केंद्र शासनाने केला असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)कलराज मिश्रा यांनी आपल्या भाषणात केंद्र शासनातर्फे अनुसूचित जाती व जमातींसाठी देण्यात येणाऱ्या विविध सवलतींचा आढावा घेतला. गेहलोत यांनी समाजातील मागसवर्गीय महिला सक्षम व्हाव्यात यासाठी केंद्र शासन विविध योजना राबवित असल्याचे सांगितले. सार्वजनिक उपक्रमांतर्गत येणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील बँकेच्या शाखेतून दोन उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी विशेष आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे.