शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कॉर्पोरेट वकील गडकरविरुद्धचा खटला सालियन चालविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2017 06:43 IST

कॉर्पोरेट वकील जान्हवी गडकरविरुद्धच्या ‘ड्रंक अ‍ॅण्ड हिट’ खटल्याची सुनावणी लवकरच सत्र न्यायालयात सुरू होईल.

जमीर काझी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून टॅक्सीचालकासह दोघांचे प्राण घेतलेल्या कॉर्पोरेट वकील जान्हवी गडकरविरुद्धच्या ‘ड्रंक अ‍ॅण्ड हिट’ खटल्याची सुनावणी लवकरच सत्र न्यायालयात सुरू होईल. त्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ रोहिणी सालियन काम पाहतील. त्यांचा नियुक्तीचा प्रस्ताव मंजुरीसाठी गृहविभागाकडे पाठविण्यात आल्याचे पोलीस आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले. पूर्व मुक्त मार्गावर दोन वर्षांपूर्वी घडलेल्या भीषण अपघाताबाबत जान्हवी विरुद्ध सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल आहे. येत्या १२ जूनला कोर्ट क्रमांक ३०मध्ये आरोप निश्चिती (चार्जफ्रेम), करण्यात येईल. कॉर्पोरेट क्षेत्रातील एक मोठा ‘ब्रॅण्ड’असलेल्या एका कंपनीत ३७ वर्षांची अ‍ॅड. जान्हवी अजित गडकर उच्च पदावर कार्यरत आहे. ९ जून २०१५ रोजी मध्यरात्री मित्रासमवेत पार्टी करून दारूच्या नशेत आॅडी चालवित चेंबूर येथील घरी परतत होती. १ वाजण्याच्या सुमारास पूर्व मुक्त मार्गावर एस ब्रीजजवळील बोगद्याच्या पुढील बाजूला विरुद्ध दिशेने गाडी चालवित समोरून येणाऱ्या टॅक्सीला उडविले होते. यात टॅक्सीचालक महंमद हुसेन अब्दुल सय्यद (५७), प्रवासी सलीम साबूवाला (५०), हे जागीच ठार झाले. तर अन्य चौघे प्रवासी गंभीर जखमी झाले होते. जान्हवीला वाचविण्यासाठी अनेक घटक प्रयत्नशील आहेत. त्यामुळे या खटल्यासाठी सरकार पक्षाकडून तज्ज्ञ वकिलाची नियुक्ती करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. त्यानुसार ज्येष्ठ वकील रोहिणी सालियन यांच्या नावाचा प्रस्ताव औपचारिक मंजुरीसाठी गृहविभागाकडे पाठविण्यात आला आहे.>जान्हवीविरुद्धचे कलममद्यधुंद अवस्थेतील जान्हवीला आरसीएफ पोलिसांनी अटक करून तिची वैद्यकीय तपासणी केली. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात ०.१९२ मद्याचे प्रमाण आढळले होते. त्यामुळे तिच्याविरुद्ध अपघातप्रकरणी भादंवि कलम ३०४ (२), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा १८३, १८४, १८५, ६६ (१) व मुंबई मद्य निषेध कायदा ८५ ही गंभीर कलमे लावण्यात आली आहेत.