शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ नगरसेवकाला वडिलांना भेटण्याची मुभा

By admin | Updated: January 19, 2016 04:05 IST

बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या चौघा नगरसेवकांपैकी काँग्रेसच्या विक्रांत चव्हाण यांना त्यांच्या

ठाणे : बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या चौघा नगरसेवकांपैकी काँग्रेसच्या विक्रांत चव्हाण यांना त्यांच्या आजारी वडिलांना भेटण्यासाठी न्यायालयाने अर्ध्या तासाची मुभा दिली. या परवानगीनंतर एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या भीमसेन चव्हाण यांची आणि मुलगा विक्रांत यांची रविवारी काही काळासाठी का होईना भेट घडून आली. आपले वडील अर्धांगवायूने ग्रस्त असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे त्यांना भेटण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी त्यांनी ठाणे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.व्ही. बांबर्डे यांच्याकडे १५ जानेवारी रोजी केली होती. त्यांच्या या अर्जावर न्यायालयाने तपास अधिकारी दिलीप गोरे यांचे म्हणणे मागविले. त्यावर, भीमसेन यांच्यावर उपचार करणाऱ्या खासगी डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीची पोलिसांनी माहिती घेतली. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याच अभिप्रायाच्या आधारावर पोलिसांनी पितापुत्र भेटीला आक्षेप घेतला. तेव्हा न्यायालयाने माणुसकीच्या दृष्टिकोनातून भीमसेन हे आजारी असल्यामुळे त्यांच्याही भावनांचा विचार करून या भेटीला अर्ध्या तासाची परवानगी दिली. न्यायालय आणि जिल्हा कारागृहाकडून परवानगीबाबतची सर्व कार्यवाही झाल्यानंतर रविवारी सकाळी १०.३० ते ११ या वेळेत विक्रांत हे आपल्या वडिलांना भेटले. वडिलांच्या प्रकृतीची विचारपूस आणि डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर त्यांची पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.(प्रतिनिधी)