शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

CoronaVirus News: तिसऱ्या लाटेने पसरले ग्रामीण भागात ‘हातपाय’; उपचाराधीन रुग्णसंख्येत ७३६ टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 06:33 IST

वाढत्या प्रादुर्भावामुळे १ जानेवारी रोजी ३२,२२५ वर असणारी राज्यातील उपचाराधीन रुग्ण आता १७ जानेवारी रोजी २,६७,३३४ वर पोहोचली आहे. म्हणजेच यात तब्बल ७३६ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबई :  राज्यात पुणे, मुंबई सारख्या मुख्य शहरांतून सुरू झालेली कोरोनाची तिसरी लाट आता ग्रामीण भागात पसरत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण पाहता वैद्यकीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त करत कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. परिणामी, वाढत्या प्रादुर्भावामुळे १ जानेवारी रोजी ३२,२२५ वर असणारी राज्यातील उपचाराधीन रुग्ण आता १७ जानेवारी रोजी २,६७,३३४ वर पोहोचली आहे. म्हणजेच यात तब्बल ७३६ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये केवळ एकअंकी सक्रिय रुग्णसंख्या होती, यातही कमालीची वाढ होऊन ही संख्या आता १०० ते ३०० च्या घरात गेली आहे. मागील दोन आठवड्यांत सक्रिय रुग्णसंख्येत वाढ झालेल्या जिल्ह्यांत वाशिम, नंदूरबार , विदर्भ, यवतमाळ, गडचिरोली, हिंगोली, भंडारा व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे.आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या लाटेच्या संसर्गाचे स्वरूप पहिल्या लाटेसारखे आहे. तेव्हाही शहरानंतर ग्रामीण भागात संसर्गाचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले होते. मागील दोन ते तीन आठवड्यांत १० जिल्ह्यांत दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूंचे प्रमाण सारखे आहे. मात्र, अन्य सात जिल्ह्यांत हे प्रमाण वाढले आहे. पालघर जिल्ह्यात मृत्यूदर ०.६ टक्क्यांनी वाढला आहे. तर, मुंबईत हे प्रमाण ०.५ टक्क्यांनी वाढले आहे. राज्याच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले, पुढील दोन आठवड्यांमध्ये मृत्यूंच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संसर्गाच्या स्थितीवर करडी नजर आहे. मुंबईत कोरोना रुग्ण घटले असले, तरीही जिल्ह्यांमधील परिस्थितीनंतरच याबाबत निष्कर्ष काढता येईल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस