शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

CoronaVirus News: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 04:39 IST

देशाच्या तुलनेत राज्यात सर्वाधिक ५६% सक्रिय रुग्ण

मुंबई : राज्यात गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. त्यानंतर आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक भयंकर असून संसर्गाची तीव्रताही अधिक असल्याचे दिसून आले आहे.राज्यात ११ फेब्रुवारी २०२१ रोजी काेराेनाचे ३०,२६५ इतके सक्रिय रुग्ण होते, तर आता ७ एप्रिलच्या नोंदीनुसार या संख्येने पाच लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला. १७ सप्टेंबर २०२० रोजी ३ लाख १ हजार ७५२, तर ७ एप्रिल रोजी ५ लाख १ हजार ५५९ सक्रिय रुग्णांची नाेंद झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. बुधवारी पहिल्यांदा पॉझिटिव्हीटीचे प्रमाण १५ टक्क्यांवर गेले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.३६ टक्क्यांवर असून मृत्युदर १.७९ टक्के आहे. देशभरात राज्यात सर्वाधिक ५६ टक्के सक्रिय रुग्ण आहेत.सर्वाधिक मृत्यूदर असलेल्या पहिल्या तीन राज्यांत महाराष्ट्राचा समावेश आहे. पंजाबमध्ये सर्वाधिक २.८० टक्के मृत्यूदर असून त्याखालोखाल सिक्कीमध्ये २.१६ टक्के आहे, त्यानंतर राज्यात हे प्रमाण १.७९ टक्क्यावंर आहे.राज्यात १ एप्रिल ते ७ एप्रिल २०२१ या कालावधीत केवळ सात दिवसांत ३ लाख ६० हजार १९३ रुग्णांची नोंद झाली आहे.संसर्गाचा पहिला भर/ पहिली लाट आणि सध्याची परिस्थिती यांची तुलना (रुग्णसंख्या)जिल्हा/ शहर    पहिली शिखर पातळी    ६ एप्रिल २०२१ची      सप्टेंबर २०२०       परिस्थितीमुंबई     ३४,२५९       ७९,३६८पुणे     ८२,१७२      ८४,३०९नाशिक     १६,५५४      ३१,६८८औरंगाबाद     १०,०५८      १७,८१८नागपूर     २१,७४६       ५७,३७२ठाणे     ३८,३८८       ६१,१२७

राज्यात ११ फेब्रुवारी २०२१ रोजी ३०,२६५ सक्रिय रुग्ण होते, ७ एप्रिलला सक्रिय रुग्णांनी पाच लाखांचा टप्पा ओलांडला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या