शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळात वर्णीसाठी रस्सीखेच

By admin | Updated: October 20, 2014 00:39 IST

राज्यात भाजपच्या सत्ता स्थापनेचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे मानले जात आहे. असे झाले तर सत्ताकेंद्र म्हणून महत्त्व आलेल्या नागपूरला

तेली, कुणबी, दलित समीकरण : खोपडे, बावनकुळे, देशमुख, माने स्पर्धेतकमलेश वानखेडे - नागपूरराज्यात भाजपच्या सत्ता स्थापनेचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे मानले जात आहे. असे झाले तर सत्ताकेंद्र म्हणून महत्त्व आलेल्या नागपूरला मंत्रिमंडळातही मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिपदे देताना पक्ष अधिक बळकट करण्यासाठी सामाजिक निकषांचा आधार घेतला जाण्याची शक्यता असून, त्यामुळे आमदारांमध्ये मोठी रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत.तेली समाज बऱ्यापैकी भाजपच्या बाजूने झुकला आहे. पूर्व नागपुरातून कृष्णा खोपडे व कामठीतून चंद्रशेखर बावनकुळे हे दोन्ही आमदार विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांच्या जाहीर सभेत ज्येष्ठ नेत्यांनी ‘तुम्ही निवडून आणा, आम्ही लालबत्ती देतो’, असे आवाहन मतदारांना केले होते. खोपडेंनी दुसऱ्यांदा विजय नोंदविला तर बावनकुळे यांनी हॅट्ट्रिक मारली आहे. खोपडे यांनी ४८ हजारावर मतांनी तर बावनकुळे यांनी ४० हजारावर मतांनी विजय नोंदवीत जनमत आपल्यासोबत असल्याचे सिद्ध केले आहे. आता या दोन नेत्यांपैकी एकाची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. पण संधी कुणाला द्यायची, यावरून पक्षापुढे पेच निर्माण होऊ शकतो. कुणबी समाजातून असलेले सुधाकर देशमुख, समीर मेघे, आशिष देशमुख, सुधाकर कोहळे हे चार आमदार विजयी झाले आहेत. यात सुधाकरराव देशमुख हे सिनिअर आहेत. शिवाय दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. लोकसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रचार प्रमुख तर प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचे सल्लागार म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता जास्त आहे. असे असले तरी समीर हे माजी खा. दत्ता मेघे यांचे पुत्र तर आशिष हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे पुत्र आहेत. दोन्ही नेते दिग्गज असून त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी मेघे-देशमुखांकडून पक्षावर दबाव बनविला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉ. मिलिंद माने हे दलित समाजाचे नेते आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून ३५ हजारावर मते घेतली होती. यावेळी भाजपने त्यांना संधी देताच त्यांनी बाजी मारली. नागपूर जिल्ह्यात भाजपला डॉ. माने यांच्या रूपात एक सुशिक्षित व आंबेडकरी चळवळीत पकड असलेला दलित चेहरा मिळाला आहे. भविष्यातील भाजप समोरची आव्हाने विचारात घेता डॉ. माने यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.