शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डी खटला : आरोपीच्या जामीन अर्जाला सरकारी पक्षाचा विरोध

By admin | Updated: November 8, 2016 04:42 IST

कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्यातील तिसरा आरोपी नितीन भैलुमे याच्यावतीने न्यायालयात सादर जामीन अर्जाला सोमवारी सरकारी पक्षाने विरोध केला

अहमदनगर : कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्यातील तिसरा आरोपी नितीन भैलुमे याच्यावतीने न्यायालयात सादर जामीन अर्जाला सोमवारी सरकारी पक्षाने विरोध केला. आरोपीस जामीन दिला तर साक्षीदार फोडण्याची शक्यता असल्याचा लेखी युक्तिवाद विशेष सरकारी वकील अ‍ॅड़ उज्ज्वल निकम यांनी न्यायालयासमोर सादर केला़ मंगळवारी न्यायालयात त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे़ जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या न्यायालयात सोमवारी कोपर्डी खटल्याची पुन्हा सुनावणी सुरू झाली़ दोषारोप ठेवलेले जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ व नितीन भैलुमे यांना हजर करण्यात आले होते़भैलुमे याचा दोषमुक्त करण्याचा अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळल्याने उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली आहे़ या अर्जाबाबत उच्च न्यायालयातील प्रगती अहवाल सादर करण्याचे न्यायालयाने सांगितले़ आरोपीचे वकील बुधवारी त्याची माहिती देणार आहेत़ त्यानंतर भैलुमेच्या अर्जावर सुनावणी होईल. कोपर्डी घटनेतील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याला गुन्हा करण्यासाठी भैलुमे याने मदत केली होती़ गुन्हा घडण्याच्या काळी वेळ आधी भैलुमे हा कोपर्डी येथील घटनास्थळाजवळील रस्त्यावरून दुचाकीवरून पेट्रोलिंग करत होता़त्यानंतरच पीडितेवर अत्याचार करून तिचा खून झाला़ भैलुमेला जामीन दिला तर साक्षीदार फोडण्याची शक्यता आहे, असा लेखी युक्तिवाद निकम यांनी न्यायालयासमोर सादर केला़ पोलिसांनी भैलुमेचे राहते घर सील केले असल्याचे त्याच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले होते़ त्याबाबत सरकारी पक्षातर्फे भैलुमेचे घर सील केले नसल्याचे निकम यांनी स्पष्ट केले़ (प्रतिनिधी)