शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

कॉपर वायर चोरणारा अटकेत

By admin | Updated: June 7, 2017 02:54 IST

कॉपर वायर निश्चित ठिकाणी पोचण्यापूर्वीच चोरी करणाऱ्या टोळीच्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : इंडोनेशिया येथून आलेली एक कोटी रुपये किमतीची कॉपर वायर निश्चित ठिकाणी पोचण्यापूर्वीच चोरी करणाऱ्या टोळीच्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून कंटेनर व ८० लाख रुपये किमतीची चोरीची कॉपर वायर जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्यात इतर तिघांचा समावेश असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.गुजरातमधील पॉलीकॅब वायर्स या कंपनीने इंडोनेशिया येथून कॉपर अ‍ॅनालेड वायर मागवली होती. सुमारे एक कोटी रुपये किमतीच्या मालाचा हा कंटेनर जेएनपीटी येथे आला होता. तिथून तो बक्शा बॉम्बे कॅरीअर्स या ट्रान्सपोर्ट कंपनीमार्फत २४ मे रोजी गुजरातला पाठवला जात होता. त्यापूर्वीच उरणमधील चिर्ले येथून हा कंटेनर चोरीला गेला होता. याची तक्रार दाखल झाल्यानंतर उरण पोलीस व गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकाने तपासाला सुरवात केली होती. कंपनीने अनिल कुंटे यांना देखील कंटेनरसोबत ठेवले होते. परंतु जेएनपीटीमधून कंटेनर बाहेर निघाल्यानंतर चालक ओमप्रकाश राजभर याने दोघा अनोळखी व्यक्तींना कंटेनरमध्ये घेतले. यामुळे कुंटे यांनी संशयाने त्यांच्याकडे चौकशीला सुरवात केल्याने काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना चाकूचा धाक दाखवून, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कंटेनर पळवून नेला होता.घडलेल्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना चोरीचा कंटेनर अहमदनगर येथील कोपरगावमध्ये असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष २ ला मिळाली. यानुसार उपआयुक्त तुषार दोषी, सहायक आयुक्त नितीन कौसडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक एन.बी. कोल्हटकर यांनी सहायक निरीक्षक किरण भोसले, बबन जगताप, सुभाष पुजारी, हवालदार अनिल पाटील, जगदीश पाटील आदींचे पथक त्याठिकाणी रवाना केले होते. त्याठिकाणी चोरीच्या कंटेनरसह रंजितसिंग बलदेवसिंग आनंद (३६) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने कंटेनरचालक राजभर व त्याच्या इतर दोन साथीदारांसोबत मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिल्याची माहिती सह पोलीस आयुक्त प्रशांत बुरडे यांनी दिली.>सासरा पोलीस, जावई चोरओमप्रकाश राजभर हा सराईत गुन्हेगार असून, तो एका पोलीस अधिकाऱ्याचा जावई असल्याची माहिती पुढे आली आहे. सोयीनुसार कंटेनरवर चालकाचे काम करताना तो त्यामधील मालाची माहिती मिळवायचा. संपर्कात असलेल्या एखाद्याला त्या मालाची आवश्यकता असल्यास संधी साधून कंटेनर चोरून न्यायचा. त्याच्यावर यापूर्वी देखील अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.