शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

बालगोविंदांच्या परवानगीसाठी समन्वय समितीची धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2016 00:59 IST

१२ वर्षांखालील गोविंदाना दहीहंडी उत्सवात सामील न होण्याचा निर्णय २०१४ साली घेण्यात आला. मात्र त्यानंतर उत्सवावरील वादाचे सावट वाढत गेले. आता पुन्हा या उत्सवाचे वेध

मुंबई : १२ वर्षांखालील गोविंदाना दहीहंडी उत्सवात सामील न होण्याचा निर्णय २०१४ साली घेण्यात आला. मात्र त्यानंतर उत्सवावरील वादाचे सावट वाढत गेले. आता पुन्हा या उत्सवाचे वेध लागल्याने दहीहंडी समन्वय समितीने याविषयीच्या ठोस निर्णयासाठी राजकीय पक्षांकडे धावाधाव सुरु केली आहे.बालगोविंदांच्या उत्सव सहभागातील बंदीनंतरही काही पथकांनी थरांवरील एक्क्याचे वय लपवित निर्णयाकडे दुर्लक्ष केले. मात्र या निर्णयानंतर पोलीस यंत्रणाही याविषयी अधिक सजग झाल्याने दहीहंडी पथकांना याचा फटकाही सहन करावा लागला. गेल्या वर्षी बऱ्याच ठिकाणी बालगोविंदांच्या सहभागामुळे हंडीच्या सरावांना अटकाव करण्यात आला होता. त्यामुळे आजमितीस, या उत्सवावरील वादाची किनार कायम आहे.यावरच उपाय शोधण्याकरिता सध्या दहीहंडी समन्वय समिती राजकीय पक्षांच्या पायऱ्या झिजवत आहे. २९ जुलै रोजी उच्च न्यायालयात अवमान याचिकेवर होणाऱ्या सुनावणीपूर्वी बालगोविंदाचा विषय निकालात निघावा, यासाठी समन्वय समितीची धावाधाव सुरु आहे. एरव्ही दहीहंडींच्या बैठकांसाठी पुढाकार घेणारे भाजपचो मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनीही या निर्णयाविषयी कोणतीच ठोस भूमिका घेतली नसल्याची खंत गोविंदांकडून व्यक्त होते आहे. तर महाराष्ट्राच्या सण-उत्सवांचे पाठीराखे असणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सत्ताधारी असो वा विरोधक कुणीही का असेना, पण बालगोविंदांचा प्रश्न मिटवा यासाठी समन्वय समितीचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. २९ जुलैला याबाबत नक्की काय होते ते कळणार आहे. (प्रतिनिधी)