शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

आफ्रिकी विद्यापीठांना शैक्षणिक सहकार्य करणार

By admin | Updated: September 28, 2016 02:19 IST

महाराष्ट्र शैक्षणिकदृष्ट्या देखील प्रगत असून आफ्रिकेतील अनेक देशांतील विद्यार्थी राज्यात उच्च शिक्षण घेत आहेत. राज्यातील विद्यापीठांचा कुलपती या नात्याने महाराष्ट्र

मुंबई : महाराष्ट्र शैक्षणिकदृष्ट्या देखील प्रगत असून आफ्रिकेतील अनेक देशांतील विद्यार्थी राज्यात उच्च शिक्षण घेत आहेत. राज्यातील विद्यापीठांचा कुलपती या नात्याने महाराष्ट्र तसेच आफ्रिकेतील विद्यापीठांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन राज्यपालांनी मंगळवारी दिले.इंडो आफ्रिकन चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीने आयोजित केलेल्या ‘आय फॉर आफ्रिका’ या चार दिवसांच्या व्यापारविषयक चर्चासत्र व प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे झाले त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र देशातील आघाडीचे औद्योगिक राज्य असून परकीय गुंतवणुकीच्या दृष्टीने सर्वाधिक पसंतीचे राज्य आहे. भारत आणि आफ्रिकन देशामधील संबंध पूर्वापार चालत आले असून महात्मा गांधींनी स्वातंत्र्य आणि न्यायासाठीचा लढा आफ्रिकेतून सुरू केल्यामुळे भारताला आफ्रिकेबद्दल तसेच तेथील लोकांबद्दल विशेष आस्था आहे. भारत आणि आफ्रिकेला मोठ्या प्रमाणात युवा लोकसंख्या लाभली असून आज कृषी, मानव संसाधन विकास, पर्यटन आदी क्षेत्रांत सहकार्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर उभयपक्षी व्यापार वाढल्यास त्याचा फायदा भारत आणि आफ्रिकेतील नागरिकांना होईल, असेही राज्यपाल म्हणाले.(प्रतिनिधी)