शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अघोरी शक्तीसाठी रूपेशचा नरबळी

By admin | Updated: November 16, 2014 00:49 IST

सात दिवसांपासून विदर्भात गाजत असलेल्या रूपेश मुळे मृत्यू प्रकरणाचा छडा लावण्यात अखेर पोलिसांना यश आले. अघोरी शक्ती वाढविण्यासाठी रूपेशचा नरबळी दिल्याची धक्कादायक बाब

तपासात निष्पन्न : गुप्तधन शोधणाऱ्यांसाठी आरोपी होता ‘कारागीर’वर्धा : सात दिवसांपासून विदर्भात गाजत असलेल्या रूपेश मुळे मृत्यू प्रकरणाचा छडा लावण्यात अखेर पोलिसांना यश आले. अघोरी शक्ती वाढविण्यासाठी रूपेशचा नरबळी दिल्याची धक्कादायक बाब तपासात उघड झाली आहे. या प्रकरणात आसिफ शहा वल्द अजीम शहा ऊर्फ मुन्ना पठाण (४०) रा. कारला सावजीनगर, वर्धा (मूळचा रा. सावध ता. बाभुळगाव जि.यवतमाळ) हा एकमेव आरोपी असल्याचेही निष्पन्न झाले आहे.सुुमारे १२ वर्षांपूर्वी आसिफ पश्चिम बंगाल येथून काळी विद्या शिकला. तेथून यवतमाळातील स्वगावी आल्यानंतर त्याची गुप्तधनाची लालसा वाढली. काही मांत्रिकांकडून याबाबतची माहितीही त्याने जाणून घेतली. यानंतर त्याने ही विद्याही आत्मसात केली. तेव्हापासून तो गुप्त धनाच्या शोधात होता. मात्र त्याला प्रत्येकवेळी अपयशच आले. यामुळे तो खचून गेला होता. दीड वर्षांपूर्वी तो वर्धेत वास्तव्याला आला. येथे तो आॅटोरिक्षा चालवून उदरनिर्वाह करीत होता. अशातच त्याने देवळी तालुक्यात गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न केला असता तिथेही त्याला अपयश आले. आपली विद्या कमी पडत आहे. ती वाढविण्यासाठी नरबळी देण्याचा अघोरी विचार त्याच्या डोक्यात थैमान घालू लागला. तेव्हापासून तो एका कोवळ्या मुलाच्या शोधात होता. अखेर ८ नोव्हेंबरला त्याने नरबळी देऊन हनुमानजीची महापूजा करण्याचा बेत आखला. तो नेहमी आर्वी नाका चौक परिसरातून आॅटोचा व्यवसाय करायचा. त्यामुळे त्याची लागूनच असलेल्या झोपडपट्टीतील लोकांशी ओळख झाली होती. रूपेशसह त्याच्या वडिलांच्याही तो संपर्कात होता. मात्र तो असे अघोरी कृत्य करेल, अशी कुणालाही कल्पना नव्हती. ८ नोव्हेंबरला सायंकाळी ५.३० वाजता रुपेश आपल्या घराच्या परिसरात मित्रासोबत खेळत असताना फिरायला जाऊ, असे सांगून तो त्याला आॅटोमध्ये बसवून घेऊन गेला. े रूपेशला घेऊन तो असा लागला छडारूपेशची हत्या वा नरबळी याबाबत पोलीस साशंक होते. मात्र आरोपीपर्यंत पोहोचणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. अशातच पोलिसांनी परिसरातील काही नागरिकांचे बयाण नोंदविले असता रूपेश त्यादिवशी आसिफच्या आॅटोमध्ये बसल्याची माहिती मिळाली. या आधारे पोलिसांनी संशयित म्हणून आसिफला ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतली असता रक्ताने माखलेली चादर सापडली. यावरुन पोलिसांचा संशय पक्का झाला.‘लोकमत’ने सर्वप्रथम वर्तविला होता नरबळीचा संशयरूपेशच्या हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर सर्वप्रथम ‘लोकमत’ने नरबळीचा संशय वर्तविला होता. इतकेच नव्हे, तर आरोपीला अटक होईपर्यंत आणि प्रकरणाचा छडा लागेपर्यंत हे प्रकरण उचलून धरले होते. यामुळे या घटनेने संतप्त वर्धेकर रस्त्यावर उतरले होते. विविध संघटनाही रूपेशला न्याय देण्याच्या मागणीला घेऊन या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने हाताळल्याने विदारक सत्य पुढे आले.