शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे जाणारा सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
3
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
4
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
7
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
8
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
9
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
10
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
11
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
12
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
13
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
14
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
15
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
16
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
17
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
18
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

राज्यामध्ये सोयीची राजकीय सोयरीक!

By admin | Updated: March 15, 2017 04:33 IST

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत एकमेकांविरुद्ध दंड थोपटून मैदानात उतरलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापती निवडीत मात्र गळ्यात गळे

मुंबई : नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत एकमेकांविरुद्ध दंड थोपटून मैदानात उतरलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापती निवडीत मात्र गळ्यात गळे घालून सोयीनुसार राजकीय सोयरिका केल्या आहेत. मराठवाड्यात भारतीय जनता पार्टीला दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आले असून, पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी राष्ट्रवादी-भाजपा तर नाशिक जिल्ह्यात सर्वच पक्ष एकमेकांसोबत आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील हा सर्वपक्षीय पॅटर्न आगळाच म्हणावा लागेल.काँग्रेससोबत युती करत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात शिवसेनेची खेळी यशस्वी झाली. औरंगाबाद पंचायत समितीच्या सभापतीपदावर काँग्रेसच्या करमाड गणातील ताराबाई उकिर्डे या विराजमान झाल्या, तर उपसभापतीपदासाठी शिवसेनेच्या गांधेली गणातील कविता राठोड यांची वर्णी लागली. तर कन्नडमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली आहे. जालना पंचायत समितीसाठी शिवसेना, काँग्रेस युती होऊन सभापतीपदी शिवसेनेचे पांडुरंग डोंगरे तर उपसभापती काँग्रेसच्या द्वारकाबाई खरात यांची निवड झाली. ही नवीन राजकीय आघाडी चर्चेचा विषय ठरत आहे. उमरग्यात काँग्रेस आणि भाजपाची मैत्री अधिक घट्ट झाली असून, या दोघांनी एकत्रित येवून पंचायत समितीत सत्ता काबीज केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)..............नवा नाशिक पॅटर्ननाशिक जिल्ह्यातील पाच पंचायत समित्यांमध्ये दोन भिन्न विचारसरणीच्या पक्षांनी परस्परांच्या गळ्यात गळे घालत सत्ता काबीज केल्याने पक्षीय सामिलकीचा नवा नाशिक पॅटर्नच निर्माण झाला आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसने माकपाशी युती करुन आपल्या पदरात उपसभापतीपद पाडून घेतले आहे. देवळा पंचायत समितीत राष्ट्रवादीला शिवसेनेची साथ मिळाली असून दिंडोरी पंचायत समितीमध्ये कॉँग्रेसने शिवसेनेसमोर नांगी टाकत त्यांच्यासोबत थेट गट नोंदणी करुन उपसभापतीपद पदरात पाडून घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ....................अकोल्यात लाठीमारअकोले पंचायत समितीत (जि. अहमदनगर) राष्ट्रवादीचे मधुकर पिचड यांनी शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. त्यामुळे अकोल्यात सेना-भाजपमध्ये राडा झाल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. जिल्ह्यात सर्वाधिक चार पंचायत समित्यांवर भाजपचे सभापती झाले आहेत. राष्ट्रवादी व कॉंग्रेसला प्रत्येकी तीन, सेनेला दोन, महाआघाडीला एक, तर गडाख यांच्या शेतकरी क्रांती पक्षाला एक सभापतीपद मिळाले आहे. तीन ठिकाणी प्रस्थापित घराणी सत्तेवर बसली आहेत. ..................................साताऱ्यात ‘सब कुछ राष्ट्रवादी’सातारा जिल्ह्यातील अकराही पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या सदस्यांची वर्णी लागली. खंडाळा पंचायत समितीच्या उपसभापतीपदी काँग्रेस तर कऱ्हाडच्या उपसभापतिपदी कऱ्हाड विकास आघाडीचा सदस्य विराजमान झाला. उर्वरित सर्व ठिकाणी राष्ट्रवादीचाच गजर झाला आहे.