कल्याण : येथील विजय तरुण मंडळाला वादग्रस्त असलेली सीडी दाखवण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी न्यायालयाकडे विनंती केली होती़ यावर सोमवारी झालेल्या सुनावणीप्रसंगी न्यायालयाने हा निर्णय दिला.
यंदाच्या गणोशोत्सवात विजय तरुण मंडळाने ‘दहशतवादाकडे तरुणांचा वाढता कल’ या विषयावर देखावा साकारला आहे. यात इसिस या दहशतवादी संघटनेत कल्याणमधील 4 तरुण सहभागी झाल्याच्या घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. यासंदर्भात तयार करण्यात आलेली सीडी वादग्रस्त असल्याचे कारण देऊन एमएफसी पोलिसांनी मंडळाला नोटीस बजावून देखाव्यावर बंदी आणली होती. या नोटिशीला मंडळाचे सल्लागार तथा शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख विजय साळवी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर देखावा दाखवण्यास न्यायालयाने परवानगी दिली होती. परंतु दोन समाजांत तेढ निर्माण होईल, असे कारण देऊन पोलिसांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिला़ (प्रतिनिधी)
आम्हाला न्यायालयाचा निर्णय मान्य आहे; परंतु पोलिसांची भूमिका म्हणजे विचारस्वातंत्र्याची गळचेपी आहे. वास्तवात घडणा:या घटना समाजापुढे येणो आवश्यक होते. तो विचार मांडण्याचा आमचा प्रयत्न होता.
- विजय साळवी
शिवसेना, कल्याण शहरप्रमुख