शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण मंडळाचे वादग्रस्त अध्यक्ष अखेर निलंबित

By admin | Updated: April 20, 2016 05:55 IST

अमरावती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष महेश करजगावकर यांना शिक्षण विभागाने अखेर निलंबित केले. शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी त्यांच्या निलंबनाचा आदेश काढता

नागपूर : अमरावती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष महेश करजगावकर यांना शिक्षण विभागाने अखेर निलंबित केले. शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी त्यांच्या निलंबनाचा आदेश काढताच, त्यांच्याकडून अमरावती विभागीय शिक्षण मंडळाचा कारभार काढून घेण्यात आला. हा पदभार नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय गणोरकर यांना सोपविण्यात आला आहे. महेश करजगावकर यांची कारकीर्द अतिशय वादग्रस्त ठरली आहे. ते नागपूरचे शिक्षण उपसंचालक असताना त्यांच्याविरोधात शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शासनाकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. सीताबर्डी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मान्यता नसलेल्या शाळेतील शिक्षकांच्या वेतनासाठी निधी मंजूर करून त्यांनी शासनाची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला होता. शिक्षकांचा अपमान करणे, त्यांना नाहक त्रास देणे, शासनाचा आदेश नसतानाही शिक्षकांसाठी कार्यशाळा घेऊन, त्यांची गोची करणे आदी प्रकारामुळे शिक्षक त्रस्त होते. गाणार यांनी त्यांच्याविरोधात शासनाकडे तक्रारींचा पाठपुरावा केला होता.करजगावकरचे प्रकरण विधान परिषदेतही गाजले होते. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी करजगावकरच्या निलंबनाची घोषणा सभागृहात केली होती. (प्रतिनिधी)