शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्युषा प्रकरणी राहुल राज विरुद्ध गुन्हा

By admin | Updated: April 6, 2016 05:01 IST

बालिका वधू फेम प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येच्या प्रकरणात राहुल प्रत्युषाच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने तिने हे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई : बालिका वधू फेम प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येच्या प्रकरणात राहुल प्रत्युषाच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने तिने हे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. प्रत्युषाचे अजूनही माजी प्रियकरांसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन राहुल तिचा शारीरिक व मानसिक छळ करत असल्याचे प्रत्युषाने तिच्या काकूला सांगितले होते. ही बाब प्रत्युषाच्या आईला कळल्यावर त्यांनी मंगळवारी बांगुरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन बांगुरनगर पोलिसांनी राहुलविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्याला कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अंबरनाथमध्ये प्रत्युषाचे काका दिपांकर बॅनर्र्जी आणि काकू बर्नाली बॅनर्जी राहतात. जानेवारी ते मार्च या दरम्यान प्रत्युषाने तीन वेळा काकींची भेट घेतली होती. त्यावेळी राहुल तिच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याबाबत तिने काकूला सांगितले होते. त्यामुळे ती मानसिक तणावाखाली असल्याचे काकूचे म्हणणे आहे. याबाबत त्यांनी प्रत्युषाच्या आईला (सोमा बॅनर्जी) सांगितले होते. मंगळवारी सोमा बॅनर्जी यांनी बांगुरनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, प्रियकर राहुल राज सिंगविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, मानसिक तसेच शारीरिक छळ करणे, शिविगाळ करणे, मारहाण करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याला कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने यांनी वर्तवली आहे. >लाईफ ईज वेरी डिफिकल्ट पापाच्प्रत्युषा बॅनर्जीचा प्रियकर राहुल राज सिंग याच्याविरुद्ध बांगुरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच आईच्या भावानांचाही बांध फुटला. राहुलने आम्हालाही प्रत्युषापासून दूर केला असल्याचा आरोप प्रत्युषाच्या आईने केला आहे. त्यात आत्महत्येच्या तीन दिवसापूर्वीच प्रत्युषाने वडीलांकडे आपले दुख मांडण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा तिने’लाईफ इज वेरी डिफिकल्ट पापा’ असे तिने वडिलांना सांगितले होते. च्सोमा बॅनर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुलने नेहमी आम्हाला प्रत्युषापासून दुर ठेवले. आम्ही रांचीचे बाहुबली असून माझ्याकडे खूप पैसा असल्याचे त्याने प्रत्युषाला सांगितले होते. आम्ही त्याच्याबाबत जास्त चौकशी करत असल्याने त्याने आम्हाला नेहमी तिच्यापासून दुर ठेवण्याचा प्रयत्न केला. आम्ही राहुलच्या कुटुंबीयांना कधीच भेटलो नाही. प्रत्युषानेही तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराबाबत काहीच सांगितले नाही. ३० मार्च रोजी जेव्हा प्रत्युषासोबत तिच्या वडिलांशी बोलणे झाले तेव्हा ती फार दु:खी वाटत होती. कामाच्या ताण असेल म्हणून आम्ही तिची समजूत काढली. तेव्हाच जर प्रत्युषाने आम्हाला सांगितले असते तर ही वेळच आली नसती असेही बॅनर्जी यांनी सांगितले.