शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-नेवाळीतील परिस्थिती नियंत्रणात, परिसरात कडेकोट बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2017 17:30 IST

नेवाळी येथील परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस तसेच महसूल प्रशासनाचे अधिकारी याठिकाणी उपस्थित आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी प्रसाद उकर्डे यांनी दिली आहे.

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि 22 -  नेवाळी येथील परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस तसेच महसूल प्रशासनाचे अधिकारी याठिकाणी उपस्थित आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी प्रसाद उकर्डे यांनी दिली आहे. गुरुवारी सकाळी कल्याण- मलंगगड रस्ता ग्रामस्थांनी रोखून धरला होता. विमानतळ जमीन संपादनाला विरोध म्हणून शेतक-यांनी हा रस्ता रोको होता. जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आंदोलनकर्त्यांची समजूत घालण्यात येत आहे असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.      
 
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात येथील १,६०० एकर जागा ताब्यात घेण्यात आली होती. या जागेवर संरक्षण विभागातर्फे संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरु करण्यावरून स्थानिक शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला होता. 
 
त्यानुसार गुरुवारी रस्ता रोकोची नोटीस देण्यात आली होती अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त ( गुन्हे) मकरंद रानडे यांनी दिली.  भाल व परिसरातील आंदोलनकर्त्यांनी नवी मुंबई, बदलापूर कडे जाणाऱ्या रस्त्यांवर टायर्स जाळून वाहतुक रोखून धरली होती. तसेच पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली एका गाडीची जाळपोळ झाली तसेच एक-दोन पोलीस  यात जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले.
 
मात्र पॅलेट गनचा वापर केल्याबाबत त्यांनी काही माहिती दिलेली नाही. सनदशीर मार्गाने आपले म्हणणे मांडावे व हिंसा करु नये असे, आवाहन पोलीस व महसूल अधिकाऱ्यांनी केले आहे.      
 
दरम्यान. १९९४ पर्यंत  नेवाळी परीसरातील जागेच्या सातबाऱ्यावर शेतकऱ्यांची नावे होती तसेच सदरची जागा संरक्षण खात्याने भाडेतत्वावर घेतल्याचे कागदपत्र शेतकऱ्यांकडे आहेत. त्यामुळे कोणतीही भरपाई न देता नावावर केलेल्या सदर जमिनीच्या सातबाऱ्यावरील संरक्षण खात्याच्या नोंदी  कमी कराव्यात. केंद्र सरकाराने थेट शेतक-यांशी चर्चा करावी कोणीही राजकिय नेता मघ्ये न टाकता शेतकऱ्यांचा प्रश्न शेतकरी आणि केंद्र सरकार यांनी बसून सोडवावा आणि शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घ्यावा अशी मागणी मनसेचे सरचिटणीस राजू (प्रमोद) पाटील यांनी केली आहे.
 
 
 
(नेवाळी विमानतळाची जागा परत द्या)                  
काय आहे नेमके प्रकरण?
 
स्वातंत्र्यपूर्व भारतात १९४२ सालच्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी नेवाळी येथे ब्रिटिश सैन्याने एक हजार ६५० एकर जागा संपादित करून विमानतळ उभारले होते. मात्र, ही जागा केंद्र सरकारने अजूनही शेतकऱ्यांना परत केलेली नाही. या जागेवर आता नौसेनेने ताबा घेतला आहे. तेथे संरक्षक भिंत उभारली जाणार आहे. 
 
१९४२ मध्ये ब्रिटिश सरकारने नेवाळी परिसरात संपादित केलेली एक हजार ६५० एकर जागा आजपासच्या १८ गावांतील शेतकऱ्यांची आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारत सरकारने ही जागा शेतकऱ्यांना परत करणे अपेक्षित होते. मात्र, सरकारने ही जागा संरक्षण खात्याकडे वर्ग केली. संरक्षण खात्याने ही जागा नौसेनेला दिली आहे. या जागेवर नौसेनेने संरक्षक भिंत उभारण्याचे काम हाती घेतले आहे. शेतकऱ्यांच्या जागा परत न करता तेथे संरक्षण भिंत उभारण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.