शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आरएसएसच्या हातात देशाचा ताबा

By admin | Updated: January 16, 2016 02:11 IST

प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा आरोप; लाँग मार्च संघर्षभूमीवर शहिदांना अभिवादन.

दुसरबीड (बुलडाणा) : देशात अच्छे दिन लायेंगे या घोषणेच्या लाटेवर मोदी सरकार सत्तारूढ झाले; परंतु राष्ट्रीय सेवा संघच या देशाची सत्ता सांभाळत आहेत. जातीच्या व धर्माच्या नावाखाली या देशाचे तुकडे पाडण्याचा डाव खेळला जात आहे; तो हाणून पाडण्याचे काम पुढील काळात करावे लागेल असा इशारा देत, पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली. १५ जानेवारी रोजी लाँग मार्च संघर्षभूमीवर प्रा. कवाडे यांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम झाला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार राहुल बोंद्रे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, गोपाळराव आटोटे, चरणदास इंगोले, जयदीप कवाडे, प्रा. रंजनाताई कवाडे, भाई छगन खंदारे, दलित मुक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय गवई आदी उपस्थित होते. औरंगाबाद विद्यापीठाच्या नामांतरलढय़ात झालेल्या शहिदांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी १५ जानेवारी २0१७ रोजी संघर्षभूमीवर विजयस्तंभ उभारण्याची ग्वाही यावेळी प्रा. कवाडे यांनी दिली. यावेळी आ. बोंद्रे, जयदीप कवाडे, विजय गवई, गोपाळराव आटोटे, चरणदास इंगोले, विजय अंभोरे, भिकाजी इंगळे यांच्यासह अनेकांची भाषणे झाली. शेवटी नामांतर स्मृती सोहळ्यातील शहिदांना आदरांजली वाहण्यात आली.