शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
2
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
3
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
4
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
5
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
6
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
7
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
8
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
9
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
10
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
11
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
12
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
13
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
14
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
15
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
16
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
17
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार
18
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा टीझर प्रदर्शित, वरुण धवन दिसला बाहुबली अवतारात
19
मुलीने बॉयफ्रेंडशी लग्नाचा तगादा लावला, बापाने लेकीचा आवाज बंद केला; मृतदेह लटकवून वेगळाच बनाव रचला 
20
ट्रम्प टॅरिफच्या संकटातही भारताची आर्थिक गाडी सुस्साट! GDP च्या वाढीत चीनलाही टाकलं मागे

दिवाळी एक्स्प्रेसवर दलालांचा ताबा

By admin | Updated: September 7, 2014 00:52 IST

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा आणि आनंदाचा सण. दूरवर नोकरीनिमित्त गेलेले चाकरमाने, विद्यार्थी या सणाला आपल्या घराकडे परततात. यामुळे या दिवसात रेल्वेगाड्या फुल्ल होतात. परंतु दिवाळीला अजून थोडाच

रेल्वे आरक्षण फुल्ल : प्रतीक्षा यादी ९०० वरदयानंद पाईकराव - नागपूरदिवाळी म्हणजे प्रकाशाचा आणि आनंदाचा सण. दूरवर नोकरीनिमित्त गेलेले चाकरमाने, विद्यार्थी या सणाला आपल्या घराकडे परततात. यामुळे या दिवसात रेल्वेगाड्या फुल्ल होतात. परंतु दिवाळीला अजून थोडाच अवधी असताना आताच दिवाळीच्या काळातील सर्व रेल्वेगाड्यातील आरक्षण फुल्ल झाले आहे. सर्वच रेल्वेगाड्यांचा ताबा दलालांनी घेतल्यामुळे प्रतीक्षा यादी (वेटींग) ९०० च्या वर पोहोचले आहे. यामुळे आता दिवाळीत प्रवाशांना दुप्पट ते तिप्पट तिकिटाचे शुल्क भरून महागड्या खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करण्याची पाळी येणार आहे.दिवाळीनिमित्त अनेकजण आपल्या कुटुंबीयांसोबत हा सण साजरा करण्याला प्राधान्य देतात. यामुळे या काळात खाजगी ट्रॅव्हल्सचे दर गगनाला भिडल्याची स्थिती असते. एरव्ही ७०० ते ९०० रुपयांना मिळणारे ट्रॅव्हल्सचे तिकीट दिवाळीच्या काळात २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांवर पोहोचते. प्रवासाचे सर्वात स्वस्त आणि फायदेशीर माध्यम म्हणून असंख्य प्रवासी रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य देतात.प्रवाशांच्या या मानसिकतेचा फायदा घेऊन दिवाळीतील सर्व आरक्षित तिकिटांवर दलालांनी ताबा मिळविल्याची स्थिती आहे. दिवाळीच्या काळात नागपुरातून मुंबई, पुणे, दिल्ली आणि बहुतांश शहरात जाणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्यांचे ‘वेटिंग’ ९०० पर्यंत पोहोचले आहे.दिवाळीला कमी अवधी असताना आताच आरक्षणाची ही स्थिती निर्माण झाल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला ताण पडणार हे निश्चित झाले आहे. नागपुरातून पुण्याला जाणाऱ्या १२१३६ नागपूर-पुणे एक्स्प्रेसमध्ये २५ आॅक्टोबरला स्लिपरमध्ये ४५२, थर्ड एसीत २९० वेटिंग आहे.२७ आॅक्टोबरला स्लिपरमध्ये ९०६ तर थर्ड एसीत २९८, २९ आॅक्टोबरला स्लिपरमध्ये २२९, थर्ड एसीत ७४ तसेच १ नोव्हेंबरला स्लिपरमध्ये १८६, थर्ड एसीत ७४ एवढी प्रतीक्षा यादी आहे. बिलासपूर-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेसमध्ये १ नोव्हेंबरला स्लिपरमध्ये ७७, थर्ड एसीत ३६, २ नोव्हेंबरला स्लिपरमध्ये १११ आणि थर्ड एसीत ३३ वेटिंग आहे. १२११४ नागपूर-पुणे गरिबरथ एक्स्प्रेसमध्ये २४ आॅक्टोबरला ६६ वेटिंग, २६ आॅक्टोबरला ९२५, २८ आॅक्टोबरला ५५३, ३१ आॅक्टोबरला ८१ आणि २ नोव्हेंबरला ५० वेटिंग आहे.मुंबई, दिल्ली मार्गावरसुद्धा हीच स्थितीमुंबईकडे जाणाऱ्या गाड्यात १२१०६ गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेसमध्ये २४ आॅक्टोबरला स्लिपरमध्ये ४२, थर्ड एसीत ७, २५ आॅक्टोबरला स्लिपरमध्ये ४२, थर्ड एसीत ७, १ नोव्हेंबरला स्लिपरमध्ये २२, थर्ड एसीत १९, २ नोव्हेंबरला स्लिपरमध्ये ३०, थर्ड एसीत १८ वेटींग आहे. दुरांतो एक्स्प्रेस आणि सेवाग्राममध्येही वेटींग ५० ते ३०० पर्यंत पोहोचले आहे. दिल्लीकडे जाणाऱ्या गाड्यातही सर्व गाड्या ८ ते ६० पर्यंत वेटींगवर पोहोचल्या आहेत. याशिवाय इतर महत्त्वाच्या शहरात नागपूरातून जाणाऱ्या गाड्यांची हीच स्थिती असल्याचे आढळले. यामुळे प्रवाशांच्या खिशाला दिवाळीत ताण पडून त्यांना अधिकची रक्कम मोजून प्रवास करण्याची पाळी येणार आहे.