शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वर्गणीला हायकोर्टाचे निर्बंध

By admin | Updated: April 25, 2015 04:12 IST

नोंदणीकृत धर्मादाय संस्था नसतानाही उत्सव साजरे करण्यासाठी वर्गणी गोळा करणाऱ्या संस्था व व्यक्तींना उच्च न्यायालयाने चाप लगावला असून अशी वर्गणी

मुंबई : नोंदणीकृत धर्मादाय संस्था नसतानाही उत्सव साजरे करण्यासाठी वर्गणी गोळा करणाऱ्या संस्था व व्यक्तींना उच्च न्यायालयाने चाप लगावला असून अशी वर्गणी नियमित व नियंत्रित करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्याचे आदेशही न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत़बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अ‍ॅक्ट, कलम ४१सी, अंतर्गत धर्मादाय संस्था नसलेली संस्था किंवा व्यक्ती अशी वर्गणी गोळा करत असल्यास त्याची माहिती धर्मादाय आयुक्तांना देणे बंधनकारक आहे़ वर्गणी गोळा करण्यास सुरूवात केल्यानंतरही यासाठी परवानगी मागितली जाऊ शकते़ त्यावर आयुक्त निर्णय घेतात़ आयुक्तांना त्यात काही दोष आढळल्यास ते ही वर्गणी मागण्यास मनाई करू शकतात़ तसेच त्या व्यक्तीला व संस्थेला दंडही ठोठावू शकतात़ हे कलम अजून प्रभावशाली करण्याची आवश्यक असून यासाठी शासनाने तज्ज्ञांची समिती नेमावी़ यात कठोर शिक्षेचाही विचार केला जावा व समितीने नेमके काय सुचवले असून त्यावर झालेला निर्णय न्यायालयात सादर करावा, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे़नवीन नियम येईपर्यंत व तो आल्यानंतरही सध्या अस्तित्त्वात असलेल्या ४१ सी या कलमाची माहिती शासनाने जाहिरात करून सर्वांना द्यावी़ महसूल विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिलदार कार्यालय व इतर कार्यालयांमध्ये याचे पोस्टर लावावेत़ वर्तमानपत्रातून याला प्रसिद्धी द्यावी़ महत्त्वाचे म्हणजे उत्सव सुरू होण्याआधी याची माहिती सर्वांना द्यावी, असेही न्यायालयाने शासनाला सांगितले आहे़ याप्रकरणी कोल्हापूर येथील शरद पाटील व निवृत्त न्यायाधीश डी़ जी़ देशपांडे यांनी जनहित याचिका केल्या होत्या़ वारणा भारतीय सेना मदत निधी या संस्थेमार्फत कारगील युद्धातील शहिदांसाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी लाखो रूपयांचा निधी गोळा करण्यात आला़ ही संस्था विनय कोरे यांची असून त्यांनी त्यांच्या साखर संस्थांच्या माध्यमातून निधी गोळा केला होता, असा आरोप याचिकेत करण्यात आला होता. मात्र त्याचा उपयोग यासाठी झाला नसल्याचा आरोप पाटील यांनी याचिकेत केला होता़ तर खाजगी संस्थांकडून गोळा होणाऱ्या निधीला निर्बंध घालावेत, अशी मागणी निवृत्त न्यायाधीश देशपांडे यांनी याचिकेत केली होती़ न्या़अभय ओक यांच्या खंडपीठासमोर या याचिकांवर सुनावणी झाली़ त्यात न्यायालयाने उत्सवांमध्ये गोळा होणारा निधी नियंत्रित करण्यासाठी वरील आदेश दिले़ तसेच वारणा संस्थेने गोळा केलेल्या निधीसंदर्भात कारवाई करण्याची आवश्यकता आहे की नाही, हे आयुक्तांनी तपासून निर्णय घ्यावा.