शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

समीक्षेतील योगदान अतुलनीय

By admin | Updated: February 29, 2016 00:46 IST

प्रा. रा. ग. जाधव यांनी मराठी साहित्यातील समिक्षेच्या क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आहे, असे गौरवोदगार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी रविवारी येथे काढले.

पुणे : प्रा. रा. ग. जाधव यांनी मराठी साहित्यातील समिक्षेच्या क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आहे, असे गौरवोदगार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी रविवारी येथे काढले.राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्रा. रा. ग. जाधव यांना डॉ. मोरे यांच्या हस्ते आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत रविवारी प्रदान करण्यात आला. प्रा. जाधव यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास आमदार प्रा. मेधा कुलकर्णी, नगरसेवक गणेश बीडकर, श्रीनाथ भिमाले, मुक्ता टिळक, साधनाचे संपादक विनोद शिरसाठ, सुनील महाजन आदी उपस्थित होते.डॉ. मोरे म्हणाले, प्रा. जाधव यांनी विविध प्रकारच्या साहित्याची समीक्षा केली. दलित साहित्याची सर्वप्रथम समीक्षा जाधव यांनीच केली. मराठी साहित्यातील श्रेष्ठ अशा पाच समीक्षकांची निवड करायची झाल्यास त्यामध्ये प्रा. जाधव यांचा आवर्जून समावेश करावा लागेल.विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारासाठी जाधव यांची निवड केल्याबद्दल राज्य शासनाचे अभिनंदन करतो, असेही डॉ. मोरे यांनी सांगितले. तावडे म्हणाले, साहित्यिकांमुळे मराठी भाषा सर्वांपर्यंत पाहोचते, मराठी भाषेचे संवर्धन होते. मराठी साहित्याचे दालन प्रा. रा. ग. जाधव यांनी समृद्ध केले आहे. समितीने त्यांची एकमताने निवड केली. त्यांचा या पुरस्काराने गौरव करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. मुंबई येथ शनिवारी मराठी भाषा दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात राज्य शासनाच्या विविध पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पण प्रकृती ठीक नसल्याने प्रा. जाधव त्या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. रविवारी तावडे यांनी जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन पुरस्कार प्रदान केला. (प्रतिनिधी)