शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

माझ्याविरुद्धचे आरोप हा तर ठेकेदारांचा कट!

By admin | Updated: June 28, 2015 02:10 IST

महिला आणि बालविकास मंत्रालयावरील ठेकेदारांच्या लॉबीचे वर्चस्व संपविण्याचा प्रयत्न केल्यानेच आपल्याला भ्रष्टाचाराच्या आरोपात गोवण्याचा प्रयत्न होत आहे,

नवी दिल्ली: महिला आणि बालविकास मंत्रालयावरील ठेकेदारांच्या लॉबीचे वर्चस्व संपविण्याचा प्रयत्न केल्यानेच आपल्याला भ्रष्टाचाराच्या आरोपात गोवण्याचा प्रयत्न होत आहे, असा दावा २०६ कोटी रुपयांच्या खरेदी घोटाळ्यात अडकलेल्या महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी केला.आरोप लावणाऱ्यांनी ते सिद्ध करणारे ठोस पुरावेही सादर केले पाहिजे, असेही आव्हान त्यांनी दिले. पुरावे कुठे आहेत? असा सवाल करून विभागाने कुठल्याही कार्यपद्धतीकडे डोळेझाक केलेली नाही असा दावा मुंडे यांनी केला. लंडन येथून एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी उपरोक्त भूमिका मांडली. महिला व बालकल्याण विभागात ठेकेदारांची एक मोठी लॉबी कार्यरत आहे आणि माझ्या मते गेल्या अनेक वर्षांपासून हीच लॉबी विभागाचे कामकाज चालवित आहे. त्यांच्या हालचालींवर माझे लक्ष असून ही लॉबी फोडण्याचा माझा प्रयत्न आहे. याबाबतील माझे मत स्पष्ट आहे, असे मुंडे यांनी सांगितले.त्या म्हणाल्या, हे आरोप अत्यंत वरकरणी आहेत. मी खर्च करीत असलेल्या सर्व २०६ कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परंतु मी येथे घोटाळा करण्यासाठी नसून मुलांच्या मदतीसाठी आहे. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आहे. विरोधकांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांचा मी आदर करते आणि त्यांच्या प्रश्नांना मी यापूर्वीच लिखित उत्तर दिले आहे, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)