शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

जुईनगरमध्ये ठेकेदाराने तोडली जलवाहिनी

By admin | Updated: January 17, 2017 03:09 IST

जुईनगर सेक्टर २४ मध्ये गटाराचे काम करणाऱ्या ठेकेदाराने जलवाहिनी तोडली आहे

नवी मुंबई : जुईनगर सेक्टर २४ मध्ये गटाराचे काम करणाऱ्या ठेकेदाराने जलवाहिनी तोडली आहे. नागरिकांनी विनंती करूनही ठेकेदाराने वाकलेला पाईप दुरूस्त करण्यास नकार दिला आहे. पालिका प्रशासनही त्याला पाठीशी घालत असून स्वखर्चाने पाईप बसविण्याच्या सूचना दिल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. येथील पंचरत्न सहकारी सोसायटीसमोरील नाला दुरूस्ती व मलनि:सारण वाहिनी टाकण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे. जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करत असताना ठेकेदाराने येथील ॐकार गृहनिर्माण सोसायटीला पाणीपुरवठा करणारा पाईप तोडला व एक ठिकाणी वाकविला आहे. यामुळे दोन दिवस रोज हजारो लिटर पाणी वाया गेले. नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणी गळती थांबविली पण वाकलेला पाईप सरळ केला नाही. यामुळे ॐकार सोसायटीला आठ दिवसापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना हे निदर्शनास आणून दिले पण पाणी पुरवठा विभागाने संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालण्यास सुरवात केली आहे. सोसायटीने स्वखर्चाने पाईप बदलून घ्यावा अशा सूचना दिल्या आहेत. पालिकेचे अधिकारी पाठीशी घालत असल्याने ठेकेदारानेही नागरिकांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले आहे. पाईप दुरूस्त करून देणार नाही असे स्पष्ट केले असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होवू लागला आहे. पंचरत्न सोसायटीसमोर गटाराचे काम करणाऱ्या ठेकेदाराने सर्व नियम धाब्यावर बसविले आहेत. काय काम सुरू आहे व कधी पूर्ण केले जाणार याचा फलक लावलेला नाही. गटार खोदून ठेवले असून तेथे अपघात होवू नये यासाठी बॅरिकेट व परावर्तक पट्ट्या बसविल्या नाहीत. यामुळे आठ दिवसामध्ये तीन जण गटारामध्ये पडले आहेत. वेळेत काम पूर्ण केले नाही तर अजून अपघात होण्याची शक्यता आहे. ठेकेदाराच्या चुकीमुळे पंचरत्न सोसायटीमधील ८० सदनिकाधारकांना त्यांच्या घरात ये - जा करता येत नाही व ॐकार सोसायटीमधील ८० सदनिकाधारकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याची प्रतिक्रिया येथील रहिवासी सागर लकेरी यांनी दिली आहे.