शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कामगार कायम होणार

By admin | Updated: April 8, 2017 03:28 IST

मुंबई महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या २ हजार ७०० सफाई कामगारांना कायम सेवेत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले

मुंबई : मुंबई महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या २ हजार ७०० सफाई कामगारांना कायम सेवेत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. याआधी औद्योगिक लवादाने संबंधित कामगारांना पूर्वलक्षी लाभाने कायम सेवेत घेण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिकेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयात हार पत्करल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयानेही महापालिकेला दणका देत कंत्राटी सफाई कामगारांना खूशखबर दिली आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने संबंधित सफाई कामगारांचा कायम नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कचरा वाहतूक श्रमिक संघाने या प्रकरणात कामगारांतर्फे न्यायालयात धाव घेतली होती. संघाचे अध्यक्ष दीपक भालेराव म्हणाले की, महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कंत्राटी सफाई कामगारांसाठी संघटनेने लढा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार औद्योगिक लवादाने १३ आॅक्टोबर २०१४ रोजी महापालिकेला २ हजार ७०० कामगारांना कायम करण्याचा निर्णय दिला होता. मात्र महापालिकेने या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. महापालिकेची याचिका २२ डिसेंबर २०१६ रोजी उच्च न्यायालयाने फेटाळून लावत औद्योगिक न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यास सांगितले होते. शिवाय २ हजार ७०० कामगारांना महापालिकेने कायम कामगार म्हणून पगाराच्या फरकासह २००७ सालापासून पूर्वलक्षी प्रभावाने कायम करण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी दिला होता. उच्च न्यायालयाच्या चपराकीनंतरही महापालिकेने आडमुठेपणाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तिथेही २१ मार्च २०१७ रोजी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याची मुदत संपेपर्यंत कोणतेही आदेश आले नव्हते. परिणामी, बुधवारी कंत्राटी कामगारांनी कायम सेवेत घेण्याचे नियुक्ती पत्र मागत महापालिकेला घेराव घातला होता. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार देत २२ डिसेंबर २०१६ रोजीचा निर्णय कायम ठेवला आहे. परिणामी, महापालिकेला संबंधित कंत्राटी कामगारांना सेवेत घेताना २००७पासून सामावून घ्यावे लागणार आहे. शिवाय या कामगारांना २०१४ सालापासूनची थकबाकीही द्यावी लागेल. (प्रतिनिधी)>लढाई सुरूच राहणारसंबंधित २ हजार ७०० कामगारांप्रमाणे आणखी कंत्राटी सफाई कामगारांची तीन विविध प्रकरणे औद्योगिक लवादाकडे प्रलंबित आहेत. त्यात ५८०, १ हजार ३०० आणि १ हजार १०० सफाई कामगारांना कायम सेवेत घेण्याची मागणी संघटनेने केली आहे. या निकालाचा दाखला देत संबंधित प्रकरणांमध्येही कामगारांच्या बाजूने निकाल लागण्याची अपेक्षा रानडे यांनी व्यक्त केली आहे.