शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

देशी गायींच्या वाणासाठी शासन करणार पतंजलीसोबत करार : मुख्यमंत्री

By admin | Updated: November 16, 2016 18:10 IST

देशी गाईचे वाण तयार करण्यासाठी पतंजली व महाराष्ट्र सरकार यांच्यात करार केला जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांकडे देशी गाई उपलब्ध होतील

ऑनलाइन लोकमतअहमदनगर, दि. १६ : देशी गाईचे वाण तयार करण्यासाठी पतंजली व महाराष्ट्र सरकार यांच्यात करार केला जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांकडे देशी गाई उपलब्ध होतील. परिणामी लाखो लिटर दूध उत्पादन होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. खडकाफाटा (ता. नेवासा) येथे पतंजलीच्या दूध प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, गेल्या १५ वर्षांपासून शेतमालाला, दुधाला भाव नाही. आतापर्यंत सहकारात फक्त माणसं मोठी झाली. अनेकांनी आपापल्या तालुक्यात दुधाचे ब्रँड तयार केले. त्यामुळे राज्याचा दुधाचा ब्रँड बुडाला. आता हा ब्रँड पतंजलीबरोबर करार करून पुढे नेऊ, असेही ते म्हणाले.

नागपूर येथे अन्नप्रक्रिया उद्योगासाठी पतंजलीला शासनाने जागा दिली, त्यावर विरोधकांनी आरोप केले. त्यामुळे आपण तीन वेळी निविदा काढल्या. पतंजलीशिवाय कोणाचीही मोठी निविदा नव्हती. पतंजलीने ज्या भावात जागा घेतली त्या भावात कोणी घेणार असेल तर आपण निविदाही काढणार नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना मारला. काळ्यापैशाविरोधात पंतप्रधान मोदींनी उचललेले पाऊल सकारात्मक आहे. त्यामुळे आतंकवाद्यांची आर्थिक नाकेबंदी झाल्याने त्यांना लगाम बसला आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी रामदेव बाबा यांनी योगाचे धडे दिले. पशुदुग्धविकास मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पालकमंत्री राम शिंदे, आमदार शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे आदी यावेळी उपस्थित होते.