शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

ठेका धरायला लावणारे नृत्य : फ्लॅश मॉब...

By admin | Updated: April 29, 2016 01:10 IST

डान्स म्हटला की डोळ्यांसमोर स्टेज उभे राहते किंवा डान्सच्या स्पर्धा आपल्याला माहिती असतात.

पुणे : डान्स म्हटला की डोळ्यांसमोर स्टेज उभे राहते किंवा डान्सच्या स्पर्धा आपल्याला माहिती असतात. पण फ्लॅश मॉब डान्स म्हणजे काय, हे अनेक जणांना माहीत नसते. हा डान्स प्रकार काय आहे, याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनामध्ये ताणलेली असते. फ्लॅश मॉब म्हणजे मॉल्स, शाळा, कॉलेज, गर्दीच्या ठिकाणी एखादा तरुण-तरुणींचा ग्रुप एकत्र येऊन नाचतो आणि समाजामध्ये जनजागृती करण्याचे काम या माध्यमातून करीत असतो. यामध्ये कोणत्याही वयाची अट नसते. आजकाल विविध डान्स स्पर्धा तरुणांना आकर्षित करीत असतात. सध्या सुरू असलेल्या डान्स रिअ‍ॅलिटी शोला मिळत असलेली प्रसिद्धी यामुळे नृत्यक्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. यामुळे विविध नृत्यप्रकार अनुभवायला, शिकायला मिळत आहेत. यासाठी तरुण-तरुणाई सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसते. कारण एखाद्या डान्सची स्टेप आपल्याला शिकायची असेल तर यू ट्यूबवर डान्स व्हीडीओ पाहून ती करता येते. त्यामुळे या भावनेवर आधारित फ्लॅश मॉब या डान्स संकल्पनेची रुजवण झालेली दिसून येत आहे. फ्लॅश मॉब म्हणजे एका ठिकाणी समूह करून लयबद्ध पद्धतीने नाचणे. यामध्ये वयाच्या कोणत्याही अटीचे बंधन नसते. त्यामुळे आता पुण्यामध्ये काही मॉल्समध्ये फ्लॅश मॉब हा डान्स प्रकार लोकांना आकर्षित करताना दिसत आहे. यामध्ये तरुण-तरुणी ग्रुप करून गाणी लावून नाचतात यामध्ये कोणालाही सहभागी होता येते. या डान्स प्रकारामध्ये मोठ्या गर्दीच्या ठिकाणी शंभरएक जणांचा ग्रुप गाणी लावून नाचायला लागतात. अनेक जण त्याकडे कुतूहलाने पाहतात तर काहींना हा वेडेपणादेखील वाटतो. पण ज्यांना ही संकल्पना माहिती आहे ते या यामध्ये सहभागी होऊन डान्स करतात. या डान्समधून एखाद्या वस्तूंची ब्रँडिंग करायची असेल तीसुद्धा े करता येते. आठ-दहा वर्षांपूर्वी सर्वांच्या कानावर पडलेला शब्द म्हणजे फ्लॅश मॉब आहे. काहींना हा नृत्यप्रकार माहिती नसेल असा प्रश्न पडतो, की फ्लॅश मॉब म्हणजे आहे तरी काय? थोडक्यात कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी हा डान्स एकत्र येऊन लोक करतात. म्हणतात ना, नृत्यातून अनेक भावना व्यक्त करता येतात. जनजागृतीसाठी या नृत्यप्रकारची सध्या बाजारात चलती आहे.फ्लॅश मॉब हा डान्स प्रकार लोकांमध्ये पोहचण्याचे चांगले माध्यम झाले आहे. वृत्तपत्र, रेडिओ, टीव्ही यामधून लोकांपर्यंत एखाद्या गोष्टीची जनजागृती तर होतेच पण ती जर डान्सच्या माध्यमातून होत असेल तर लोकांचे मनोरंजनही होते. ज्यांना आवड आहे त्यांना डान्सही करता येतो, अनेक गोष्टी पोहचतात. त्यामुळे फ्लॅश मॉब हा नृत्यप्रकार आज लोकांना जास्त जवळचा वाटत आहे.- मानसी कानिटकर, डान्स कोरिओग्राफर