शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

‘एमबीए’च्या विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने घट

By admin | Updated: March 7, 2016 03:34 IST

अभियांत्रिकीसोबतच राज्यात व्यवस्थापन अभ्यासक्रमांनादेखील विद्यार्थ्यांच्या दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे. गेल्या दशकात पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची सर्वात मोठी

योगेश पांडे,  नागपूरअभियांत्रिकीसोबतच राज्यात व्यवस्थापन अभ्यासक्रमांनादेखील विद्यार्थ्यांच्या दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे. गेल्या दशकात पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची सर्वात मोठी पसंती असलेल्या ‘एमबीए’ची क्रेझ हळूहळू सरत चालली आहे. गेल्या चार वर्षांपासून सातत्याने विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असून, पदव्युत्तर व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांची संख्यादेखील सुमारे ११ टक्क्यांनी घटली आहे.‘एआयसीटीई’च्या (आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) आकडेवारीनुसार २०१२ सालापासून महाविद्यालयांची संख्या सातत्याने कमी होत असून, विद्यार्थ्यांची प्रवेशक्षमतादेखील कमी झाली आहे. २०१२ साली महाराष्ट्रात ४५९ महाविद्यालयांत हे दोन्ही अभ्यासक्रम होते. २०१५ मध्ये हाच आकडा ४०६ वर पोहोचला. केवळ तीन वर्षांत ५३ महाविद्यालये बंद झाल्याचे दुर्दैवी चित्र राज्यात पाहायला मिळाले. महाविद्यालयांची संख्या कमी झाल्यामुळे ओघाने प्रवेशक्षमतेतही घट झाली. ०१२ मध्ये जी प्रवेशक्षमता ६४ हजार ४१६ होती ती २०१५ मध्ये ५५ हजार ८०१ वर पोहोचली. तीन वर्षांतच ८ हजार ६१५ म्हणजे सुमारे १३.४ टक्के जागा कमी झाल्या. २०१२पासूनच्या आकडेवारीनुसार ‘एमबीए’ किंवा ‘एमएमएस’ अभ्यासक्रमांत प्रवेश घेण्यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये निरुत्साह दिसून येत असल्याचे स्पष्ट होते. प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने दाखविली जातात. मात्र, त्यानंतर त्यांच्या पदरी निराशाच येते. यातूनच महाविद्यालयांतील जागा रिकाम्या राहण्यास सुरुवात झाली. २०१२ साली राज्यातील २५ हजार १७६ (३९ टक्के) जागा रिक्त होत्या. २०१५ मध्ये हा आकडा ३२ ते ३६ टक्क्यांच्या घरात होता.