शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

खगोलशास्त्रातील नवे पर्व सुरू

By admin | Updated: February 13, 2016 02:36 IST

गुरुत्वीय लहरींच्या शोधामुळे खगोलशास्त्रातील नव्या पर्वाला सुरूवात झाली असून शास्त्रज्ञांसाठी संशोधन करण्यास मोठे दालन खुले झाले आहे, असे मत ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञांनी व्यक्त केले.

पुणे : गुरुत्वीय लहरींच्या शोधामुळे खगोलशास्त्रातील नव्या पर्वाला सुरूवात झाली असून शास्त्रज्ञांसाठी संशोधन करण्यास मोठे दालन खुले झाले आहे, असे मत ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञांनी व्यक्त केले.अमेरिकेसह पुण्यातील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्टॉनॉमी अ‍ॅण्ड अ‍ॅस्टोफिजिक्स (आयुका) येथे एकाचवेळी गुरुत्वीय लहरींची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हीटेशनल वेव्ह आॅब्झर्व्हेटरीच्या (लिगो) अंतर्गत संशोधन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या गटानेहीया संशोधनात महत्त्वाचे योगदानदिले आहे.या सर्व शास्त्रज्ञांचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, अनिल काकोडकर, डॉ. श्रीधर बॅनर्जी,अरुण श्रीवास्तव, धीरज बोस,सुनील मुखी, यशवंत गुप्ता यांनी अभिनंदन केले. जगात केवळ दोन ठिकाणी लिगो प्रयोग शाळा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात तिसरी लिगो प्रगोगशाळा स्थापन करणार असल्याची घोषणा केल्याचे समजताच आयुकातील खगोलप्रेमींनी टाळ््या वाजवून आनंद व्यक्त केला.जयंत नारळीकर म्हणाले, ‘‘लिगो गटातील शास्त्रज्ञांनी मोठे यश मिळविले असून, ही अनंत काळात लक्षात राहणारी घटना आहे. आयुका स्थापनेच्या वेळी केवळ चार सदस्य होते. त्यावेळी निधी कसा मिळवला असा आमच्या पुढील प्रश्न होता. गुरुत्त्वीय लहरींवर सुरू असलेल्या संशोधनातून काहीही हाती लागणार नाही, असे काहीजण बोलत होते. मात्र, खचून न जाता त्यावरील संशोधन सुरू ठेवले.’’ज्येष्ठ शास्त्रज्ञ सी. व्ही. विश्वेश्वरा म्हणाले, ‘‘मला कृष्णविवरांचा अभ्यास करता आला. आईन्स्टाईनने मांडलेल्या थेअरीचा अभ्यास करता आला. आज गुरुत्वीय लहरींचा शोध लागला आहे. या ऐतिहासिक क्षणामुळे मी भारावून गेलो आहे.’’डॉ. अनिल काकोडकर म्हणाले, ‘‘या शोधात भारतीय शास्त्रज्ञांनी मोठे योगदान दिले असून, विज्ञानाच्या इतिहासात नोंद ठेवली जाईल अशीच आजची घटना आहे. भारताने या क्षेत्रातील संशोधनावर गुंतवणूक केली पाहिजे.’’योगदान देणारे भारतीय शास्त्रज्ञआयआयटी गांधीनगर येथील आनंद सेनगुप्ता, तिरुअनंतपुरम येथील अर्जना पै, मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूटमधील सी. एस. उन्नीकृष्णन , चेन्नई येथील के. जी. अर्जुन, बेंगलेरू येथील पी. अजिथ, कलकत्ता येथील राजेश नायक, आणि आयुकातील सुखांत बोस यांनी गुरुत्वीय लहरींच्या संशोधनात योगदान दिले आहे.