शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालये २४ तास सुरू ठेवा!

By admin | Updated: June 5, 2017 03:24 IST

पावसाळ्यात डोके वर काढणाऱ्या साथीच्या आजारांवर वेळीच प्रभावी नियंत्रण करणे शक्य व्हावे, यासाठी तत्काळ पूर्वतयारी करण्याचे आदेश आरोग्य उपसंचालकांनी दिले

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पावसाळ्यात डोके वर काढणाऱ्या साथीच्या आजारांवर वेळीच प्रभावी नियंत्रण करणे शक्य व्हावे, यासाठी तत्काळ पूर्वतयारी करण्याचे आदेश आरोग्य उपसंचालकांनी दिले असून ठाणे, पालघर, रायगड तिन्ही जिल्ह्यांतील सर्व महापालिका व सिव्हील रुग्णालयांना २ आॅक्टोबरपर्यंत २४ तास रुग्णालये कार्यरत ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. कीटकजन्य व जलजन्य साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वेळीच पूर्वतयारी करण्याचे आदेश जारी करून २ आॅक्टोबरपर्यंत २४ तास रुग्णालये कार्यरत ठेवण्याचे आदेश आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे यांनी सर्व रुग्णालयांना दिले आहेत. यामध्ये ठाणे, पालघर, रायगड अशा जिल्ह्यांतील सर्व सिव्हील रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे यांचा समावेश आहे. याशिवाय ठाणे मनपा, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर आणि वसई-विरार महापालिका रुग्णालयांसाठी आदेश जारी झाले आहेत. प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवणे, दैनंदिन सर्वेक्षण, जोखीमग्रस्त गावांची निवड व कार्ययोजना, पाणीगुणवत्ता सनियंत्रण, नियमित कीटकशास्त्रीय सर्वेक्षण, एकात्मिक कीटक व्यवस्थापन, पुरेसा औषधसाठा, नियंत्रण कक्षाची स्थापना, मीडिया स्कॅनिंग सेल, शीघ्र प्रतिसाद पथक, गावपातळीवर साथरोग सर्वेक्षणात कार्यकर्त्यांना सहभागी करून घेणे, ग्राम आरोग्य, स्वच्छता व पोषण समित्यांच्या बैठका, आरोग्य शिक्षण आदींची पूर्वतयारी करून घेण्याची सक्ती रुग्णालयांवर करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीवर नियंत्रण अतिवृष्टी, पूर, दरड कोसळणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीस तोंड देण्यासह संभाव्य जीवित व मालमत्तेची हानी टाळण्याच्या दृष्टीने प्रभावी नियंत्रणाची गरज आहे. त्यासाठी सज्ज राहण्याची गरज आहे.