शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदाचा एक दावेदार शर्यतीबाहेर

By admin | Updated: March 1, 2017 06:03 IST

संख्याबळ अधिक असल्याने महापौरपदाचे दावेदार असलेल्या शिवसेनेला पक्षातील ज्येष्ठ नगरसेवकांनी जेरीस आणले आहे.

मुंबई : संख्याबळ अधिक असल्याने महापौरपदाचे दावेदार असलेल्या शिवसेनेला पक्षातील ज्येष्ठ नगरसेवकांनी जेरीस आणले आहे. खुल्या वर्गासाठी असलेल्या या पदाचे दावेदार अधिक असल्याने शिवसेनेची पंचाईत झाली आहे. यापैकी एक दावेदार असलेले शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव यांना गटनेतेपद देण्यात आले आहे. मात्र यामुळे महापौरपदाच्या शर्यतीतून ते पुन्हा एकदा बाद झाले आहेत. गेली अडीच वर्षे मुंबईचे महापौरपद अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित होते. त्या वेळी यशवंत जाधव यांच्या जागेवर निवडून आलेल्या त्यांच्या पत्नी यामिनी जाधव यांचे नाव चर्चेत होते. यासाठी जाधव यांनी सर्व शक्ती पणाला लावली. मात्र जाधव यांना डावलून शिवसेनेने स्नेहल आंबेकर यांना महापौरपद दिले. महापालिका निवडणुकीत उतरवलेले काही ज्येष्ठ निवडून आल्यामुळे त्यांनी मोठ्या पदांवर दावा करण्यास सुरुवात केली आहे. यापैकी महापौरपदाच्या शर्यतीत असलेले जाधव यांच्यावर यंदा तरी पक्षश्रेष्ठींची कृपा होईल, असे वाटत होते. मात्र शिवसेनेने आपल्या सदस्यांची कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करताना जाधव दाम्पत्याची पुन्हा एकदा घोर निराशा केली आहे. यशवंत जाधव यांना गटनेतेपद देण्यात आल्याने शिवसेना सत्तेत आल्यास ते सभागृह नेता होतील. मात्र शिवसेनेची संधी हुकली तर ते विरोधी पक्षनेते ठरतील. त्यामुळे महापौरपदाच्या शर्यतीतून ते आपोआपच बाहेर फेकले गेले आहेत. १९९७ पासून ते शिवसेनेत असून तिसऱ्यांदा नगरसेवकपदी निवडून आले आहेत. त्यांच्या पत्नीही या वेळेस निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र यामिनी जाधव यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. (प्रतिनिधी)>नगरसेवकांमध्ये चुरस महापौरपद या वेळेस खुले असल्याने शिवसेनेतील बड्या नगरसेवकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यामध्ये पुरुष नगरसेवकच नव्हे तर महिला नगरसेवकांनीही जोर लावला आहे. पुरुष नगरसेवकांमध्ये मंगेश सातमकर, विश्वनाथ महाडेश्वर, रमेश कोरगावकर, रमाकांत रहाटे यांच्यात महापौरपदासाठी रस्सीखेच आहे. तर महिलांमध्ये माजी आमदार आणि माजी महापौर विशाखा राऊत, राजूल पटेल, शुभदा गुडेकर, किशोरी पेडणेकर यांच्यात स्पर्धा आहे. >सेनेचे संख्याबळ ८८महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे ८४ तर भाजपाचे ८२ नगरसेवक निवडून आले आहेत. सत्ता स्थापनेसाठी ११४ हा जादुई आकडा गाठणे दोन्ही पक्षांना अद्याप शक्य झालेले नाही. तरीही प्रतिष्ठेच्या महापौरपदासाठी शिवसेनेची धडपड सुरू असून चार अपक्षांचे बळ मिळवण्यात त्यांना यश आले आहे. महापौरपदासाठी भाजपाही उत्सुक असल्याने सदस्यांची फोडाफोडी होऊ शकते. त्यामुळे आपल्या सदस्यांची तत्काळ नोंदणी करण्यासाठी शिवसेनेने आज कोकण विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली. शिवसेनेकडे पाच अपक्षांचे समर्थन असल्याचा दावा करण्यात येत असला तरी आज ८८ सदस्यांचीच नोंदी झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांनीही अनुक्रमे त्यांच्या ३१ आणि ९ सदस्यांची स्वतंत्र नोंदणी केली आहे.