शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अरुंधती रॉय यांना अवमानना नोटीस

By admin | Updated: December 24, 2015 02:23 IST

माओवादी डॉ. गोकराकोंडा नागा साईबाबाच्या जामिनावरून लिहिलेल्या लेखात न्यायव्यवस्थेवर अतिशय गंभीर व निंदास्पद आरोप केल्यामुळे बुकर पुरस्कारप्राप्त लेखिका अरुंधती रॉय यांना

नागपूर : माओवादी डॉ. गोकराकोंडा नागा साईबाबाच्या जामिनावरून लिहिलेल्या लेखात न्यायव्यवस्थेवर अतिशय गंभीर व निंदास्पद आरोप केल्यामुळे बुकर पुरस्कारप्राप्त लेखिका अरुंधती रॉय यांना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी फौजदारी अवमानना नोटीस बजावली आणि २५ जानेवारी रोजी उत्तर सादर करण्याचे निर्देश त्यांना दिले आहेत.‘आऊटलूक’च्या १२ मे २०१५ रोजीच्या अंकामध्ये रॉय यांचा लेख प्रकाशित झाला आहे. या लेखात रॉय यांनी केंद्र शासन, राज्य शासन, पोलीस व्यवस्था व सशस्त्र दलासह न्यायव्यवस्थेवरही टीका केली आहे. साईबाबाला गुणवत्ता व वैद्यकीय कारणावरून जामीन मिळावा, यासाठी रॉय यांनी ही खेळी केली हे लेख वाचल्यानंतर लक्षात येते. सत्र न्यायालय व उच्च न्यायालयाने साईबाबाला जामीन नाकारला याबाबत अवगत असताना रॉय यांनी हा लेख लिहिला. साईबाबाला कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळावा असे त्यांना वाटते, हे दिसून येते, असे न्यायमूर्ती अरुण चौधरी यांनी सांगितले.रॉय स्वत:ला कायद्यापेक्षा श्रेष्ठ समजतात रॉय या स्वत:ला कायद्यापेक्षा श्रेष्ठ समजतात असे दिसून येते. यापूर्वी अशाच एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना १ दिवसाचा कारावास व २००० रुपये दंड ठोठावला होता. ‘आऊटलूक’मधील लेखात रॉय न्यायव्यवस्थेवर गंभीर आरोप करण्याबरोबरच साईबाबाचा जामीन फेटाळण्याच्या आदेशावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.हा न्यायालयाचा फौजदारी अवमान आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.