शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

पाणी वापर संस्थांचे होणार वर्गीकरण!

By admin | Updated: November 6, 2014 00:20 IST

जलसंपदा विभागाचा निर्णय ; पाणी वापर संस्था सक्षमीकरण अभियान.

अकोला: राज्यातील पाणी वापर संस्थांचे वर्गीकरण करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. यासाठी १0 ते २५ नोव्हेंबरदरम्यान पाणी वापर संस्था सक्षमीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानात पाणी वापर संस्थांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे. शेतीसाठी पाण्याचे समान वाटप करण्यासह पाण्याच्या संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी पाणी वापर संस्थांकडे असते. राज्यात १८ लाख ६४ हजार ६९२ हेक्टर क्षेत्रावर एकूण ४ हजार ६७६ पाणी वापर संस्थांची स्थापना झाली आहे. पाणी वापर संस्था सक्षम असल्यास पाण्याचे उत्कृष्ट व्यवस्थापन होऊ शकते. त्यामुळे राज्याच्या जलसंपदा विभागाने पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. पाणी वापर संस्था सक्षमीकरण अभियान राबविण्याच्या सूचना, शासनाने राज्यातील सर्वच जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता, तसेच कार्यकारी अभियंत्यांना दिल्या आहेत. अभियानात सर्व कालवा निरीक्षक, मोजणीदार, स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यक, शाखा अभियंता, मुख्य अभियंता, स्वयंसेवी संस्था, पुरस्कार प्राप्त पाणी वापर संस्था सहभागी होणार आहेत. शासनाने अभियानाची रूपरेषाही निश्‍चित केली आहे. अभियानाच्या नियोजनाबाबत प्रधान सचिव ७ नोव्हेंबरला ह्यव्हिडीओ कॉन्फरन्सह्णद्वारे आढावा घेणार आहेत. *पाणी वापर संस्थांचे होणार वर्गीकरण अभियानातंर्गत पाणी वापर संस्थांचे ह्यअह्ण, ह्यबह्ण आणि ह्यकह्ण, असे तीन गटात वर्गीकरण करण्यात येणार आहे. वर्गीकरणासाठी काही निकषही लावण्यात येणार आहेत. *ह्यअँक्शन प्लॅनह्ण सादर करण्याचे आदेशपाणी वापर संस्थांना घनमापन पद्धतीने पाणी देण्याच्या सूचना महाराष्ट्र जनसंपत्ती प्राधिकरणाने दिल्या आहेत. त्यामुळे सिंचन क्षेत्र हस्तांतरित झालेल्या पाणी वापर संस्थांना प्राधान्याने पाणी मोजके बसवून घनमापन पद्धतीने पाणी मोजून देण्यात येणार आहे. यासाठी तात्काळ ह्यअँक्शन प्लॅनह्ण सादर करण्याच्या सूचना, शासनाने सर्व मुख्य अभियंत्यांना दिल्या आहेत.