शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

भाजी खरेदीकडे ग्राहकांची पाठ

By admin | Updated: June 6, 2017 01:35 IST

शहरात बंदच्या सावटामुळे किरकोळ विके्रत्यांसह सर्वसामान्य ग्राहकांनीही भाजी खरेदीकडे पाठ फिरविल्याचे चित्र सोमवारी दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : भाज्यांची उपलब्धता असूनही शहरात बंदच्या सावटामुळे किरकोळ विके्रत्यांसह सर्वसामान्य ग्राहकांनीही भाजी खरेदीकडे पाठ फिरविल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. त्यामुळे घाऊकसह किरकोळ बाजारात रविवारच्या तुलनेत सर्व भाज्यांचे भाव निम्म्याने खाली आले.महाराष्ट्र बंदचे सावट बाजारातील उलाढालीवर दिसून आले. बंदमुळे अनेक शेतकऱ्यांनी बाजाराकडे पाठ फिरविली. त्यामुळे रविवारी बाजारात रविवारच्या तुलनेत निम्मीच म्हणजे केवळ ३५ टक्के आवक झाली. आवक कमी होऊनही मागणीअभावी भाज्यांचे भावही निम्म्याने उतरले आहेत. ज्येष्ठ अडते विलास भुजबळ म्हणाले, ‘‘बंदमुळे सोमवारी आवक कमी झाली असली तरी ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविली. अनेक किरकोळ विक्रेत्यांनी रविवारीच भाज्यांची मोठी खरेदी केली होती. त्यातच बंदमुळे अनेक जण बाजारात फिरकले नाही. त्यामुळे आवक कमी होवूनही काही प्रमाणात भाजीपाला शिल्लक राहिला. तसेच कांदा, लसूण आणि पालेभाज्या वगळता इतर सर्व भाज्यांचे भाव निम्म्याने खाली आहेत.’’ तर काम बंद आंदोलन : डॉ. बाबा आढावशेतमालाला हमीभाव, कर्जमुक्ती व शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांवर राज्य शासनाने लवकरात लवकर ठोस निर्णय जाहीर करावा, अन्यथा राज्यातील बाजार समित्यांमधील हमाल काम बंद आंदोलन करतील, असा इशारा ज्येष्ठ कामगारनेते डॉ. बाबा आढाव यांनी दिला. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात कामगार युनियनच्या वतीने आयोजित बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी, हमीभावाबाबत कायदा, हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा शंकास्पद वाटतात. त्यासाठीची ठोस भूमिका शासनाने जाहीर करायला हवी. पेन्शन व शेतकऱ्यांना मोफत वीज, पाणी याबाबत मुख्यमंत्री काहीच बोलले नाहीत़ ’’ भुसार बाजारात हमालांचा बंदमार्केट यार्डातील भुसार बाजारातील हमालांनी सोमवारी शेतकरी संप व महाराष्ट्र बंदला पाठिंबा देत काम बंद ठेवले. त्यामुळे बाजारातील उलाढाल जवळपास ठप्प झाली होती. बंद असला तरी व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली होती. मालाचीही काही प्रमाणात आवक झाली. मात्र, हमाल नसल्याने व्यवहार झाले नाहीत, असे दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले यांनी सांगितले.