शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शेताततला कांदा थेट ग्राहकांपर्यंत

By admin | Updated: October 17, 2015 03:11 IST

दुष्काळ, अवकाळी पाऊस, साठेबाजार या सगळ्या गोष्टींमुळे कांद्याचे भाव मध्यंतरी कमालीचे वाढले होते. कांदा शंभरी गाठेल की काय, असे अडाखे बांधले जात होते.

अरुणकुमार मेहत्रे , कळंबोलीदुष्काळ, अवकाळी पाऊस, साठेबाजार या सगळ्या गोष्टींमुळे कांद्याचे भाव मध्यंतरी कमालीचे वाढले होते. कांदा शंभरी गाठेल की काय, असे अडाखे बांधले जात होते. मात्र ओला कांदा मार्केटमध्ये आल्याने कांद्याचे भाव काही प्रमाणात कमी झाले आहेत. मात्र आजच्या घडीला किरकोळ बाजारात सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर कांदा गेला आहे. कांदा ही जीवनावश्यक बाब झाली असून, किंमत वाढली की सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी येते. आता ओल्या कांद्यालासुद्धा प्रति किलो ५० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे जिथे त्यापेक्षा कमी किमतीत कांदा मिळतो याचा शोध ग्राहक घेतच असतात. ही नस पकडून मूळचे जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील विपुल आणि अतुल डुंबरे या दोघा भावांनी आपल्या शेतात पिकलेला कांदा बाजार समितीत न नेता कामोठे येथे टेम्पो भरून आणला आहे. कामोठे येथे रस्त्याच्या कडेला टेम्पो उभा करून विक्र ी सुरू केली आहे. चार कि.मी. क्षमता असलेल्या बॅगेत सव्वातीन किलो कांदे भरून ती बॅग १२० रुपयांना दिली जात आहे. त्यांनी टेम्पोसमोर एक आकर्षक बॅनर्स लावून कांद्याची विक्री सुरू केली आहे. स्वस्तात कांदा मिळत असल्याने कामोठेकरांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. आमच्याकडे १० टन माल असून, तो थेट ग्राहकांना विकणार असल्याचे डुंबरे याने सांगितले. येत्या दोन दिवसांत खारघर, कळंबोली, नवीन पनवेल या वसाहतीत आम्ही सेल लावणार असल्याचेही तो म्हणाला. मी आयटी इंजिनीअर असून, कंपनीत नोकरीही करतो. मात्र सुटी व सकाळ-संध्याकाळी विक्रीसाठी येतो, आपल्या घरचा माल विकण्याची लाज काय बाळगायची, असे तो म्हणाला.