शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

मेट्रो रेल्वेचे बांधकाम ‘पीपल फे्रंडली’

By admin | Updated: February 1, 2015 01:00 IST

जलद परिवहनासाठी नागपुरात लवकरच सुरू करण्यात येणारे मेट्रो रेल्वेचे बांधकाम ‘पीपल फ्रेंडली’ राहील, अशी ग्वाही नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित

बृजेश दीक्षित यांची ग्वाही : कंपनी कायद्याखाली आठवड्यात नोंदणीमोरेश्वर मानापुरे - नागपूरजलद परिवहनासाठी नागपुरात लवकरच सुरू करण्यात येणारे मेट्रो रेल्वेचे बांधकाम ‘पीपल फ्रेंडली’ राहील, अशी ग्वाही नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी लोकमतशी बोलताना दिली. हा प्रकल्प कुणालाही त्रास न होता २०१८ च्या अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. मेट्रो माझ्यासाठी आहे, असे लोकांना वाटले पाहिजे. गाड्या पार्किंगमध्ये ठेवून मेट्रोने प्रवास करावा, असे उद्दिष्ट आहे. रस्त्यावरील अपघात कमी व्हावेत, पर्यावरणमुक्त वातावरण आणि रस्त्यावरील वाहतुकीचा भार कमी करणारा हा प्रकल्प आहे. लोकांचे जीवनमान उंचावण्याचा मेट्रोचा उद्देश आहे. कालबद्ध कार्यक्रमानुसार प्रकल्पाचे काम सुरू असल्याचे दीक्षित म्हणाले. जागेचे सर्वेक्षण एकूण ३६ कि़मी.चा दोन मार्गे आणि बांधकामाच्या पूर्णत्वापर्यंत ८,९०० कोटींची गुंतवणूक असलेल्या मेट्रो रेल्वेच्या बांधकामासाठी सध्या जागेचे सर्वेक्षण सुरू आहे. दोन्ही मार्गासाठी २०-२० अधिकारी कार्यरत आहेत. पुढील कामाच्या रूपरेषेसाठी बोर्डाची पहिली बैठक पुढील महिन्यात होणार आहे. चमूची नियुक्ती, त्यांचे अधिकार रोडमॅप, कामाची पद्धत, प्रत्यक्ष काम आणि सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. चेअरमन आणि एमडीसह बोर्डाचे दहाही सदस्य उपस्थित राहतील. कंपनी कायद्यासाठी नोंदणीसाठी कंपनीने सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. दहा दिवसात कंपनी म्हणून नोंदणी होईल, असे दीक्षित यांनी स्पष्ट केले. अध्यक्षपदी शंकर अग्रवालनागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि.च्या दहा जणांच्या चमूमध्ये अध्यक्षपदी शंकर अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या केंद्र सरकारच्या शहरी विकास खात्यात सचिव पदावर कार्यरत आहेत. अग्रवाल यांच्यासह पदसिद्ध सदस्यांमध्ये याच खात्यातील मुकुंद कुमार सिन्हा व झांजा त्रिपाठी, कोची मेट्रोचे वेदमणी तिवारी, भारतीय रेल्वेचे शैलेंद्र सिंग, व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित, अतिरिक्त वित्त सचिव सुधीरकुमार श्रीवास्तव, यूडीआयचे प्रधान सचिव नितीन करीर, नागपूरचे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर आणि नासुप्रचे सभापती श्याम वर्धने यांचा समावेश आहे.