शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सीआरझेडमध्ये बांधकाम बंदी

By admin | Updated: February 13, 2016 02:29 IST

राज्यातील पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतच्या सात जिल्ह्यांत सीआरझेडमध्ये कुठल्याही स्वरूपाची बांधकाम परवानगी देण्यास राष्ट्रीय हरित लवादाच्या पश्चिम विभागीय खंडपीठाने

मीरा रोड (ठाणे) : राज्यातील पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतच्या सात जिल्ह्यांत सीआरझेडमध्ये कुठल्याही स्वरूपाची बांधकाम परवानगी देण्यास राष्ट्रीय हरित लवादाच्या पश्चिम विभागीय खंडपीठाने मनाई केली आहे. महाराष्ट्र सागरी किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) जुन्याच नकाशांच्या आधारे बांधकामांना परवानगी दिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर लवादाने हा मनाई आदेश लागू केला.पाच वर्षांपूर्वीच्या सीआरझेड अधिसूचनेनुसार एमसीझेडएमएने नकाशे जाहीर करून मगच काही सीआरझेड क्षेत्रांत बांधकामांना परवानगी देणे बंधनकारक होते. मात्र, एमसीझेडएमएने जुन्या नकाशांच्या आधारे बांधकामांना मंजुरी दिल्याबद्दल वनशक्ती संस्थेने याचिका दाखल केली होती. मुंबई, मुंबई उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे सात जिल्हे सागरी व खाडीकिनाऱ्यांवर वसलेले आहेत. सीआरझेडबाधित असलेल्या या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर कांदळवन व पाणथळ आहे. उच्च न्यायालयाचे आदेश व कायद्याचे सर्रास उल्लंघन करून पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे. त्यातच एमसीझेडएमएकडून सीआरझेडमध्ये वारेमाप बांधकाम परवानग्या देतानाच सीआरझेडबाधित बांधकामे नियमित केली जात आहेत. परवानगी दिल्यानंतर होणाऱ्या अटीशर्तींच्या उल्लंघनाकडेदेखील एमसीझेडएमएकडून सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप वनशक्तीकडून करण्यात आला.एमसीझेडएमएला मिळालेली मुदतवाढ ३१ जानेवारी रोजी संपली होती. तीन वेळा मुदतवाढ घेऊनदेखील नवीन नकाशे जाहीर केले जात नसताना पुन:पुन्हा मुदतवाढ मात्र मागितली जात असल्याकडे लवादाचे लक्ष वेधण्यात आले. लवादाचे न्यायाधीश यू.डी. साळवी व तज्ज्ञ अधिकारी डॉ. अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने १० फेब्रुवारी रोजी एमसीझेडएमएला पुन्हा मुदतवाढ देण्यास नकार दिला. जोपर्यंत नकाशे जाहीर करत नाहीत, तोपर्यंत सीआरझेडमध्ये कुठल्याही स्वरूपाची बांधकाम परवानगी देण्यास तसेच बांधकामे नियमित करण्यास मनाई केली. (प्रतिनिधी)पाच वर्षांपूर्वीच्या सीआरझेड अधिसूचनेनुसार एमसीझेडएमएने नकाशे जाहीर करून मगच काही सीआरझेड क्षेत्रांत बांधकामांना परवानगी देणे बंधनकारक होते. मात्र, एमसीझेडएमएने जुन्या नकाशांच्या आधारे बांधकामांना मंजुरी दिल्याबद्दल वनशक्ती संस्थेने याचिका दाखल केली होती.