शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट महामंडळाची घटनादुरुस्ती

By admin | Updated: June 20, 2016 00:50 IST

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त घटनेमध्ये सदस्यत्व नोंदणी, नूतनीकणापासून निवडणूक प्रक्रियेपर्यंतचे अनेक बदल करण्याची गरज संचालक

पुणे : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त घटनेमध्ये सदस्यत्व नोंदणी, नूतनीकणापासून निवडणूक प्रक्रियेपर्यंतचे अनेक बदल करण्याची गरज संचालक मंडळाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली. महामंडळाची घटना १९७० मध्ये तयार करण्यात आली होती. घटनादुरुस्तीच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना सामावून घेण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. त्यासाठी घटना समिती नेमण्यात आली असून समितीची पहिली बैठक दि. २१ जून रोजी होणार आहे. आॅगस्टमध्ये होणाऱ्या सर्वसाधारण सभेत घटनादुरुस्तीला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यापासून घटनादुरुस्ती लागू करण्यात येईल, अशी माहिती अध्यक्ष मेघराजे राजेभोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, खजिनदार संजय ठुबे, वर्षा उसगावकर, निकिता मोघे, चैत्राली डोंगरे, विजय खोचीकर, शरद चव्हाण, अण्णा देशपांडे, पितांबर काळे, सतीश रणदिवे, रवींद्र बोरगावकर, विशाल पवार, मनोज कुलकर्णी आदी उपस्थित होते. राजेभोसले म्हणाले, ‘घटना सत्तरच्या दशकात तयार केली. त्यामध्ये कालानुरूप बदल करण्याची गरज आहे. यामध्ये सदस्यत्वापासून निवडणूक प्रक्रियेतील बदलांचाही समावेश आहे. दुरुस्तीच्या प्रस्तावाला संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. नवीन घटना लवकरच तयार करण्यात येणार आहे.’ (प्रतिनिधी)