शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा निर्मितीसाठी मतदारसंघाचा निकष

By admin | Updated: July 20, 2016 05:09 IST

राज्यात नवीन जिल्हा आणि तालुका निर्मितीसाठी विधानसभा मतदारसंघाचा निकष ठेवण्यात यावा

मुंबई : राज्यात नवीन जिल्हा आणि तालुका निर्मितीसाठी विधानसभा मतदारसंघाचा निकष ठेवण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी बाकांवरील सदस्यांनी विधान परिषदेत केली. राष्ट्रवादीचे अब्दुल्लाखान दुर्राणी यांनी नवीन जिल्हा निर्मितीबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या चर्चेदरम्यान ही मागणी करण्यात आली.राज्यातील नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीबाबत अप्पर मुख्य सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीला वारंवार मुदतवाढ देण्यात आली. समितीचा नेमका अहवाल कधी सादर केला जाईल आणि त्याचे निकष काय असतील असा प्रश्न दुर्राणी यांनी उपस्थित केला. यावर सदर समितीस ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर नवीन जिल्हा, तालुक्यांच्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिले. समितीचा अहवाल तातडीने मंत्रिमंडळासमोर नेण्यात येईल असेही राठोड म्हणाले. तर, नवीन तालुका निर्मितीत मतदारसंघ हा निकष ठरविण्याची मागणी काँग्रेसचे सतेज पाटील यांनी केली. त्यास सुनील तटकरे आदी सदस्यांनी पाठींबा दिला. तालुका आणि जिल्हा विकासासाठी बहुतांश निधी हा मतदारसंघानुसार येतो. अनेक ठिकाणी एका मतदारसंघात तालुक्यातील विविध भाग जोडलेला असतो. त्यामुळे योग्य रितीने विकासकामे होत नाहीत, अशी सूचना सतेज पाटील यांनी केली. यावर असा निकष ठरविण्याबाबत विचार करण्याचे आश्वासन राज्यमंत्र्यांनी दिले. तालुका विभाजनाचे निकष निश्चित करण्याबाबत कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीचा अहवाल शासनास प्राप्त झाला आहे. यावर सर्व विभागीय आयुक्तांकडून मागविण्यात आलेले अभिप्राय शासनास प्राप्त झाले आहेत. त्यानुसार तपासणी करून तालुका विभाजनाचे निकष निश्चित करण्याकामी धोरणात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येईल असे राठोड यांनी सांगितले. तसेच यापूर्वी नवीन निर्मिती झालेल्या जिल्ह्यातील पायाभूत सुविधांबाबत बैठक घेऊन त्याबाबतचा निर्णय घेतला असल्याचे राठोड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>मंत्रिमंडळापुढे प्रस्तावतालुका विभाजनाचे निकष निश्चित करण्याकामी धोरणात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येईल, असे राज्यमंत्री राठोड यांनी सांगितले.