शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याची गरज लक्षात घेत उल्हासच्या उपखो-यातील पाण्याचा एकात्मिक जल आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 19:36 IST

या उल्हास खो-यामधून ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर, ठाणे, उल्हासनगर, पालघरच्या वसई तालुक्यास पाणी पुरवठा होत आहे. याशिवाय रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, पनवेल. तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ तालका. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात या उल्हास नदीच्या खो-यातील पाण्याचा वापर केला जात आहे.

ठळक मुद्दे भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन उल्हास उपखा-यातील पाण्याचा एकात्मिक जल आराखडा ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर, ठाणे, उल्हासनगर, पालघरच्या वसई तालुक्यास पाणी पुरवठा होत आहे रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, पनवेल. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ तालकानाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात या उल्हास नदीच्या खो-यातील पाण्याचा वापर

ठाणे : भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन उल्हास उपखा-यातील पाण्याचा एकात्मिक जल आराखडा तयार करण्यात येत आहे. या त्याला अंतिम मान्यता मिळण्यापूर्वी २३ जानेवारी रोजी येथील कोपरी कॉलनीतील सिंचन भवन येथे सकाळी ११ ते ५ या वेळेत जन सुनावणीसह कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.उल्हासनदीच्या या खोºयातून ठाणे जिल्ह्यातील बहुतांशी शहराना देखील पाणी पुरवठा होत आहे. याशिवाय रायगड, पुणे, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यातील तालुक्यांचा पाणी पुरवठा देखील या उपखोºयातून होत आहे. भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन येथील पाण्याचा एकात्मिक जल आराखडा तयार करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.  जलसंधारण, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, कृषी, महाराष्ट्र जीवन, प्राधिकरण उद्योग, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आदींकडून सद्य:स्थितीतील व भविष्यकालीन म्हणजे २०३०पर्यंतची पाण्याची गरज विचारात घेवून हा एकात्मिक जल आराखडा तयार करण्यात आला आहे.या उल्हास खो-यामधून ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर, ठाणे, उल्हासनगर, पालघरच्या वसई तालुक्यास पाणी पुरवठा होत आहे. याशिवाय रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, पनवेल. तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ तालका. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात या उल्हास नदीच्या खो-यातील पाण्याचा वापर केला जात आहे. यासाठी पश्चिम वाहिनी नद्या खो-याची विभागणी सव्वीस उपखो-यामध्ये करण्यात आली असून या प्रत्येक उपखो-याचा प्रारु प जल आराखडा तयार करण्यात आला आहे.उपखोºयातील भूपृष्ठावरील व भूगर्भातील पाण्याचा एकात्मिक जल आराखडा तयार करणे, जलसंपत्ती संरक्षण व त्यामध्ये निरंतर सुधारणा करणे ही या जल आराखड्याची प्रमुख उद्दीष्टे आहेत. त्यानुसार कोकणातील उल्हास खो-याचा प्रारूप जल आराखडा तयार करण्यात आलेला आहे. यासाठी जनसुनावणी व कार्यशाळेसाठी संबंधितानी उपस्थित राहून आपली मते नोंदवण्याचे आवाहन येथील ठाणे पाटबंधारे मंडळाने केले आहे.

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार