शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

गेल्या २३ वर्षांत ठाणे जिल्ह्याचे अतिरेकी कारवायांशी कनेक्शन

By admin | Updated: January 23, 2016 04:02 IST

देशात कोणत्याही ठिकाणी होणाऱ्या दहशतवादी कृत्यात गेल्या २३ वर्षांत नवी मुंबई, ठाणे, कल्याण, भिंवडी, मीरा-भार्इंदर आणि पालघर जिल्ह्यांचा येनकेन संबंध आलेला आहे.

नारायण जाधव,  ठाणेदेशात कोणत्याही ठिकाणी होणाऱ्या दहशतवादी कृत्यात गेल्या २३ वर्षांत नवी मुंबई, ठाणे, कल्याण, भिंवडी, मीरा-भार्इंदर आणि पालघर जिल्ह्यांचा येनकेन संबंध आलेला आहे. जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येसह आयटीपार्कच्या जाळ्यामुळे दशहतवाद्यांच्या कारवायांसाठी या परिसराचा वापर होत आहे. या दोन्ही जिल्ह्यांत सात महापालिका, पाच नगरपालिका आणि ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासह ठाणे आणि नवी मुंबई ही दोन अति महत्त्वाची पोलीस आयुक्तालये आहेत. १९९३चे मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट, अहमदाबाद येथे पोलीस चकमकीत मारली गेलेली नरेंद्र मोदींच्या हत्येच्या कथित कटातील संशयित मारेकरी असलेली इशरत जहाँ, २००२मध्ये मुंब्यातूनच पकडले हिजबुलचे अतिरेकी असो किंवा इसिसमध्ये सामील होण्यास गेलेले कल्याणचे ते चार तरुण असोत. किंवा आता पुन्हा मुंब्य्रातूनच एटीएस आणि एनआयएने आता पकडलेला इसिसचा अतिरेकी, यामुळे मुंब्य्रासह ठाणे जिल्ह्यातील देशविघातक कारवाया पुन्हा एकदा प्रकाशझोतात आल्या आहेत. पडघा, तलासरी- डहाणूचा समुद्रकिनारा, नवी मुंबईतून पकडलेले अतिरेकी, गेलेले ई मेल या साऱ्या घटना जिल्ह्यातील भविष्यातील धोक्याची नांदी सांगणाऱ्या आहेत.जितक्या गतीने जिल्ह्यात नागरिकीकरण होत आहे, तितक्याच किंंबहुना त्याहून अधिक वेगाने येथील नागरी समस्यांसह सुरक्षेचे प्रश्न वाढत आहेत. संसदेवरील हल्ला, आर्मी आणि आॅइल सेंटरमध्ये आपले जाळे अधिक घट्ट करण्याचे काम करणारे तलासरीतून एटीएसने पकडलेले लष्कर-ए-तोयबाचे दोन हस्तक किंंवा वाराणसीत झालेल्या बॉम्बस्फ ोटांची माहिती देणारा नवी मुंबईतून गेलेला ई-मेल. मुंबईवरील २६/११चा हल्ला करणारा अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी डहाणू मार्गे केलेला प्रवेश. या साऱ्या गोष्टी देशातील दहशतवाद्यांचे पालघर, कल्याण, ठाणे व नवी मुंबईचे कनेक्शन उघड केले आहे. दहशतवाद्यांचे जिल्ह्यात असलेले जाळे सर्वप्रथम १९९३मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर उघडकीस आले. या ठिकाणी वापरलेल्या आरडीएक्सपैकी सुमारे २८३० किलो आरडीएक्स मुंब्य्रात सापडले होते. त्यानंतर वाशीच्या एका प्रतिष्ठित हॉटेलातून संशयावरून अहमद अफरोज नावाच्या तरुणास अटक केली होती. त्या वेळी तो निर्दोष की गुन्हेगार यावरून वातावरण चांगलेच तापले होते. नंतरच्या काळात संसदेवरील हल्ल्याच्या कटातील आरोपी अबू हमजा ठाण्यातूनच पकडला गेला. मार्च २००२मध्ये हिजबुलच्या दोन अतिरेक्यांना मुंब्य्रातून अटक केली होती. घाटकोपर, मुलुंड येथील लोकलसह अहमदाबाद, जयपूर येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी ठाण्यातील नागला बंदर, भिवंडीनजीकच्या बोरोली गावातून पोलिसांनी हत्यारे आणि अतिरेक्यांशी संगनमत करणाऱ्या साथीदारास पकडले होते. त्या वेळी हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या मारुती वॅगनार गाड्या नवी मुंबईतून चोरल्याचे निदर्शनास आले होते.अक्षरधाम आणि संसदेवर हल्ला झाला तेव्हा नवी मुंंबईतील टीएस चाणक्य, एनआरआय वसाहतींचा बंदोबस्त वाढविला होता. पाम बीच मार्गावर हवाई दलाचे रडार त्यासाठी तैनात केले होते. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान मुख्यमंत्री यांच्या हत्येच्या कथित कटात सहभागी असलेली संशयित इशरत जहाँ मुंब्रा येथील रहिवासी होती. जंगली पठाण या पाक नागरिकाला ठाण्यातून अटक झाली होती. मागे २००९ मध्ये नवी मुंबईतील घणसोलीतून मुमताज चौधरीसह कळंबोली आणि कोपरखैरणेतून अतिरेक्यांना अटक झाली होती. नवी मुंबईतील पाम बीच मार्गावरील एका इमारतीतून केन हेवूड या विदेशी नागरिकास पोलिसांनी ताब्यात घेतले होते. नंतर अमेरिकेच्या दबावानंतर भारत सरकारने त्यास परत जाण्याची परवानगी दिली होती.अजमल कसाब आणि त्याचे साथीदार डहाणूमार्गेच मुंबईत आले होते. तेव्हा मुंबई एटीएसने रझाक आणि रशीद या दोघा लष्करच्या हस्तकांना अटक केल्यानंतर महाराष्ट्र, गुजरात अन् राजस्थानमधील आर्मीचे तळ आणि आॅईल कंपन्यांत आपल्या पंटरांचे जाळे विणण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. हे उघड झाले होते. हे कमी म्हणून की काय, त्या काळात वाराणसीत झालेल्या बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्वीकारणारे इंडियन मुजाहिद्दीनचे ई-मेल नवी मुंबईच्या वाशी नोडमधील सेक्टर १७ सारख्या प्रतिष्ठित वस्तीतून गेल्याचे पोलिसांनी उडघकीस आणले होते.नुकतेच कल्याणमधील ४ उच्च शिक्षित तरुण इसिसमध्ये सहभागी होण्यास गेल्याचे उघड झाले आहे. त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही.