शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

पर्यावरणाचा -हास केल्याप्रकरणी मीरा-भाईंदर पालिका अभियंत्यांसह चौघांवर गुन्हा

By admin | Updated: February 8, 2017 23:13 IST

दीपक खांबितसह ठेकेदार व जप्त केलेल्या डंपरचा चालक-मालक विरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल केला आहे

ऑनलाइन लोकमतमीरा रोड, दि. 8 - भाईंदर पश्चिमेस महापालिकेने नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाचे विस्तारीकरणासाठी कांदळवन व पाणथळ क्षेत्रात सातत्याने चालवलेल्या मातीभरावप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात पालिकेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबितसह ठेकेदार व जप्त केलेल्या डंपरचा चालक-मालक विरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. खांबित यांच्यावर हा दुसरा गुन्हा आहे.वास्तविक सीआरझेड 1 मध्ये पालिकेने बेकायदा कचरा-माती भराव करून बोस मैदान तयार केले. गेल्या दीड वर्षापासून पालिकेने विस्तारीकरणाच्या नावाखाली मुंबई उच्च न्यायालयाचे मनाई आदेश धुडकावून कांदळवन व पाणथळ क्षेत्रत सातत्याने माती भराव बांधकामे करून पर्यावरणाचा -हास चालवला आहे. शनिवारी या ठिकाणी एक डंपर माती भराव करताना पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या आदेशाने पोलिसांनी ताब्यात घेतला आणि गुन्हा दाखल करण्याबाबत प्रांत अधिकारी सुदाम परदेशी यांना कळवले. परदेशी यांच्या आदेशाने मंडळ अधिकारी लक्ष्मण पवार यांनी फिर्याद दिली.

दीपक खांबित सह भराव आदी करणारे ठेकेदार प्रकाश जाधव, डंपरचा मालक विक्रम शिंदे रा. कामण व चालक संतोष नांगरे रा. केतकी पाडा अशा चौघां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षभरापूर्वी याच परिसरात माती भराव करून कांदळवनाचा रहास केल्या प्रकरणी करनी चरण या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. तर काही महिन्यांपूर्वी कांदळवनात शौचालये बांधल्या प्रकरणी खांबित यांच्यावर भाईंदर पोलिस ठाण्यातच गुन्हा दाखल झाला होता. पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे पुढिल तपास करीत आहेत.